भंडारा पत्रिका/प्रतिनिधी नागपूर : आपण निसर्गाचे रक्षण केले तर निसर्ग आपले रक्षण करेल अन्यथा अवकाळी निसर्ग अवकृपा पाहायला मिळेल. त्यामुळे नैसर्गिक संसाधनांचा सजगतेने वापर करायला हवा, राखेला समस्या न मानता संधी समजायला हवे. महानिर्मिती राख धोरण २०२४ नुसार शासकीय, निमशासकीय, सार्वजनिक उपक्रमाच्या रस्ता कामांसाठी राख उचल करणाºया संस्थांना रु.१००/प्रती टन आर्थिक सहाय्य करण्याचे महानिर्मितीचे धोरण असल्याचे त्यांनी सांगितले. सोबतच महानिर्मितीच्या कोराडीखापरखेडा-चंद्रपूर वीज केंद्रात राख उचल करण्यासाठी अत्याधुनिक सोयी सुविधा उभारणार असल्याचे डॉ. धनंजय सावळकर यांनी प्रतिपादन केले. ते नागपुरात आयोजित महानिर्मितीच्या राख उपयोगिता शिबिराच्या उद्घाटन सत्रात बोलत होते.