भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गोंदिया :- गोंदिया तालुक्यातील दासगाव खुर्द येथे पाण्यात बुडून दोन शालेय विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची घटना आज घडली आहे. आलोक भागचंद बिसेन (९) व प्रिन्स किशोर रहांगडाले (९) असे मृतक विद्यार्थ्यांची नाव आहेत. हे दोन्ही विद्यार्थी जिल्हा परिषद हिंदी पूर्व माध्यमिक पाठशाला दासगाव खुर्द येथील विद्यार्थी होते. दुपारी जेवण झाल्यानंतर ते बाहेर फिरायला गेले असता ते परत आले नाही. संध्याकाळी त्यांच्या पालकांनी शोध घेतला असता शाळेजवळील मुरुमाच्या खड्ड्यात त्यांचे प्रेत आढळून आले. या दोन्ही चिमुकल्या विद्यार्थ्यांच्या मृत्यूने गावात शोककळा पसरली आहे. त्या दोघांचे मृतदेह गोंदिया जिल्हा सामान्य रुग्णालय येथे आणण्यात आले आहे.