पालकमंत्री ना.विजयकुमार गावीत आज जिल्ह्यात

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : आदिवासी विकास विभाग मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित हे उद्या दिनांक १४ आॅगस्ट रोजी जिल्हा दौºयावर येणार असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. डॉ.विजयकुमार गावित उद्या सकाळी नऊ वाजता रवी भवन येथून शासकीय वाहनाने भंडाºयाला आगमन करतील. सकाळी ११:३० वाजता पवनी भंडारा येथे आगमन व पवनी येथील शिंगाडा लागवडी क्षेत्रास भेट देतील. त्यानंतर अडीच वाजता जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीसाठी जिल्हा नियोजन भवन येथे उपस्थित राहतील. सायं. ५ वाजता जिल्हा चिकित्सक भंडारा यांचे कडील दोन रुग्णवाहिकांच्या लोकार्पण कार्यक्रमास उपस्थित राहतील. त्यानंतर भंडारा येथे मुक्काम. गुरुवार दि.१५ आॅगस्ट रोजी सकाळी ९ वाजता भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त राष्ट्रध्वजारोहण कार्यक्रमास उपस्थित राहून सकाळी १०.१५ वाजता पोलीस जिम्नेशियम येथील बॅडमिंटन व टेबल टेनिस कोर्टचे उद्घाटन त्यानंतर सकाळी १०:४० वाजता पोलीस स्टेशन भंडारा येथील सीसीटीव्ही नियंत्रण कक्षाचे उद्घाटन व त्यानंतर महसूल पंधरवड्याच्या समारोपीय कार्यक्रमास सकाळी ११:१५ मिनिटांनी उपस्थित राहतील. या कार्यक्रमानंतर सकाळी १०:३० वाजता शासकीय विश्रामगृह येथे वेळ राखीव. दुपारी एक वाजता भंडारा विश्रामगृहावरून शासकीय वाहनाने रेल्वे स्टेशन भंडारा कडे प्रयाण करतील.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *