भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गोंदिया :- कोहमारा ते रायपूर राष्टÑीय महामार्गावरील देवरी परिसरातील नवनिर्मीत उड्डाणपुलावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने प्रवाशी नागरीकांना मोठया अडचणींचा सामना करावा लागत आहे. आज खा.प्रशांत पडोळे हे या मार्गाने जात असतांना त्यांना हा प्रकार लक्षात येताच त्यांनी गाड्यांचा ताफा थांबवुन सदर पुलावरील खड्डयांची पाहणी केली. यावेळी सदर बांधकाम निकृष्ट दर्जाचे असल्याचे लक्षात येताच खा.पडोळे यांनी संताप व्यक्त करीत संबंधीत कंत्राटदार व अधिकारी यांना चांगलेच खडेबोल सुनावले.सदर बांधकाम अग्रवाल ग्लोबल इन्फ्राटेक प्रायव्हेट लिमिटेड कंपनी करीत आहे. कोहमारा ते रायपूर मार्गावरील राष्टÑीय महामार्गावरील उड्डाणपुलाचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे होत असल्याचे दिसुन आले.उड्डाण पुलावर अनेक ठिकाणी थातुरमातूर या ठिकाणी काम होत असते, सदर ब्रिजला लागलेले आरीवॉलला (गट्टू) मोठमोठ्या भेगा पडल्या असुन कोहमारा ते देवरी दरम्यान बांधकाम निकृष्ट दर्जाचे करण्यात येत आहे. मागील पंधरा दिवसांत याठिकाणी दोन अपघात झाले आहेत.
लवकरात लवकर या उड्डाणपुलाची दुरूस्ती न झाल्यास जनआंदोलन करण्याचा इशारा खा.प्रशांत पडोळे यांनी यावेळी दिला. एकीकडे भाजपा सरकार विकासाची चर्चा करते आणि दुसरीकडे एवढे मोठे भगदाड पाडून ठेवते, जनतेच्या जीवाशी खेळू नका, योग्यरित्या बांधकाम करण्यात यावे असे निर्देश खा.प्रशांत पडोळे यांनी यावेळी अधिकाºयांना दिले. यावेळी माजी आ. तथा जिल्हाध्यक्ष काँग्रेस कमिटी गोंदिया दिलीप बनसोड , तालुकाध्यक्ष सडक अर्जुनी मधुसूदन दोनोडे, दामोधर नेवारे, रोशन बडोले, दिनेश हुकरे, किशोर शेंडे, विजय दुबे, दिलीप सोनवाणे, किरणताई हटवार सरपंच दुग्गीपार, पुष्पाताई खोटेले, धनवंताताई गभने, निनाताई राऊत, शंकर मेंढे, विरू गौर, संतोष लाढे, नॅशनल हायवे अग्रवाल ग्लोबल कंपनी लिमिटेड अधिकारी यावेळी उपस्थित होते.