भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा: पवनी तालुक्यातील अड्याळ जवळील चकारा येथील प्राचीन,रमणीय टेकड्या व तलावाने बहरलेले भगवान बालाजीचे मंदिर आहे.पर्यटन अभ्यासक मो सईद शेख यांनी मंदिर ट्रस्ट अंतर्गत असलेल्या या उपेक्षित, दुर्लक्षित मंदिर परिसराचा कायापालट होवून एक सुंदर पर्यटन स्थळ म्हणून विकसित व्हावे करिता प्रयत्न केले. पवनी क्षेत्राचे माजी आमदार बंडूभाऊ सावरबांधे यांचे माध्यमातून शासन दरबारी पाठ पुरावा करून या स्थळास “क” वर्ग पर्यटन यादीत समाविष्ट करण्यात आले.सईद शेख यांच्या माहिती नुसार प्राचीन काळात लिंगा व मल्ल्या पाटील हे देवस्थान चे संस्थापक होते.त्यांना दोन पुत्र होते काशिनाथ आबाजी आणि बाबाजी .काशिनाथ कडून १८५० साली बालाजी देवस्थान बांधण्यात आले.
मंदिरात ८ व ९ व्या शताब्दी चे श्री हरी बालाजी भगवान ची मूर्ती स्थापित असून गणेश,नवदुर्गा, शेषनाग, लक्ष्मी, ब्रम्हा, गोविंद, उपेंद्र,वासुदेव,प्रधुमन,अनिरुद्ध,दामोदर,दशावतार,अनंत शेषशायी महाविष्णू नारायण चे पाय चेपणाºया लक्ष्मी ची अद्भुत शिल्पे,कोरीव व नक्षीकाम पाहण्यासारखे आहे.अद्भुत कला सौंदर्याचा खजिना असलेले हे मंदिर असून पर्वत टेकड्या व मंदिर ला लागून असलेल्या तलावामुळे येथील सौंदर्यात भर पडते.उजव्या बाजूस असलेल्या हनुमानाची सिन्दुर निर्मित प्राचीन मूर्ती स्थापित असून सिवनी(म. प्र.) येथील एका परम भक्ताला स्वप्नात मंदिरात येण्याचे आमंत्रण मिळताच त्याने इथे येवून पूजा,यज्ञ करून हनुमंतास चांदीचे डोळे बसविले आणि तो इथे अधून_मधून येत असतो. चकारा चे या मंदिर व परिसराचे जतन, सुशोभीकरण, सौंदर्यीकरण. तात्काळ करण्याबाबत ग्रीन हेरिटेज पर्यटन संस्थे कडून शेख यांनी भंडारा पवनी क्षेत्राचे आमदार नरेंद्र भोंडेकर, जिल्हाधिकारी भंडारा व पुरातत्व विभागाचे सहायक संचालक यांना पत्र लिहिले असता पत्राची दखल घेण्यात आली.पुरातत्व विभाग तर्फे मुंबई येथून आर्किटेक्ट इंजिनियर शरयू मोरे मॅडम व त्यांचे सहकारी इथे येवून त्यांनी मंदिर परिसर चे मोजमाप केले.या पर्यटन स्थळाचे काम लवकर सुरू करण्यात येणार आहे.