भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : महिलांच्या आर्थिक विकास- ासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जिल्ह्यात कार्यरत असून यामधून एकूण दोन लाख ३ हजार ५८१ महिला पात्र ठरले आहेत. जिल्ह्यातील जास्तीत जास्त महिलांना लाडकी बहिणी योजनेचा लाभ देणार असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी गुरुवार दि. १५ आॅगस्ट २०२४ रोजी केले. पोलीस कवायत मैदानावर आयोजित ७८ व्या स्वातंत्र्यदिनाच्या मुख्य कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी खासदार प्रशांत पडोळे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष गंगाधर जिभकाटे, जिल्हा परिषद सदस्य यशवंत सोनकुसरे यांच्यासह जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर, मुख्य कार्यकारी अधिकारी समिर कुर्तकोटी, पोलीस अधिक्षक लोहीत मतानी, उपवनसंरक्षक राहुल गवई यांच्यासह प्रशासनातील सर्व वरीष्ठ अधिकारी उपस्थित होते. आधारभूत दरानुसार ६८८ कोटी रुपये धान उत्पादक शेतकºयांच्या खात्यात आॅनलाईन पद्धतीने वर्ग करण्यात आल्याची माहिती पालकमंत्र्यांनी त्यांच्या भाषणात दिली.
मुख्यमंत्री कार्य प्रशिक्षण कार्यक्रमात जास्तीत जास्त युवक युवतींना सामावून घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. जलजीवन मिशन जिल्ह्यातील एकूण ८३ टक्के कुटुंबांना नळ जोडणी देण्यात आल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले. पोलीस कवायत मैदानावर गुरुवारी सकाळी नऊ वाजून पाच मिनिटांनी मुख्य ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न झाला. त्यानंतर राष्ट्रगीत होऊन परेड निरीक्षण झाले. पोलीस, गृह रक्षक दल, छात्रसेना वविद्यार्थी यांनी मानवंदना दिली. परेड संचलनानंतर विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार पालकमंत्री श्री. गावित यांनी यांच्या हस्ते करण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन स्मिता गालफाडे व मुकुंद ठवकर यांनी केले. हरघर तीरंगा अभियानाच्या पार्श्वभुमीवर तीरंगा शपथ घेण्यात आली. या मुख्य शासकीय कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात विद्यार्थी नागरिक माध्यम प्रतिनिधी तसेच महिला बचत गटाच्या प्रतिनिधी प्रामुख्याने उपस्थित होत्या.