भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गोंदिया : श्रमिक पत्रकार संघाचे पत्रकार गण आपल्या कर्तव्यासह सामाजिक उपक्रम ही राबवितात त्या अंतर्गत हे गेल्या १५ वर्षापासुन विविध क्षेत्रातील उत्कृष्ठ पत्रकार, गुणवंत विद्यार्थी आणि सामाजिक संस्था यांचा दरवर्षी सत्कार करतात हे उपक्रम स्तुतीप्रद आहे. माझ्याकडुन त्यांच्या या कार्याचे व विजेते पत्रकार आणि गुणवंत विद्यार्थी तसेच समाजात समजासाठी काम करणाºया संस्था या सर्वांना शुभेच्छा देतो असे खा. प्रफुल्ल पटेल म्हणाले. श्रमिक पत्रकार संघाचा टिळक गौख पुरस्कार वितरण सोहळा १५ आॅगस्ट रोजी गोंदिया येथील राईस मीलर्स असोसिएशनच्या सभागृहात दुपारी १२:३० वाजता पार पडला,या प्रसंगी मंचावर खा. प्रफुल्ल पटेल यांच्यासह जि.प. अध्यक्ष पंकज रहांगडाले, आ. विनोद अग्रवाल, आ. मनोहर चंद्रिकापुरे, माजी आ.राजेंद्र जैन, बांधकाम सभापतीसंजय टेंभरे, समाज कल्याण सभापती पुजा सेठ, रविकांत बोपचे, भावना कदम, पो. नि. किशोर पर्वत, पत्रकार संघाचे अध्यक्ष हाजी अल्ताफ शेख उपस्थित होते.
पुढे बोलतांना पटेल म्हणाले की, पत्रकार संघाच्या या व्यासपीठावर पत्रकारांनी गोंदिया जिल्ह्यातील भावी व इच्छुक आमदारांना बसविलेले आहे. पण पुढील विधानसभा निवडणुकीत ज्यांच्यावर माझा आर्शिवाद असेल तोच आमदार होईल. अशी कोपरखळी मारली. कार्यक्रमाची सुरूवात पत्रकार संजीव बापट यांच्या गणेश वंदना गायन व दीप प्रज्वलन तसेच लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. या प्रसंगी श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने दरवर्षी प्रमाणे दिला जाणारा लोकमान्य बाळ गंगाधर टिळक गौरव पुरस्कार मोहन पवार यांना तसेच सहयोग मल्टीस्टेट स्टेट क्रेडीटी को-आॅप सोसायटी लि. गुणवंत विद्यार्थी पुरस्कार एस.एस. सी. (१० वी) तील गुणवंत विद्याथ्यां मध्ये रिया गेडाम, आचल पुस्तोडे, ऋषीकेश चिखलोंढे, अनुष्का राऊत आणि एच.एस.एस.सी (१२ वी) मधील जिल्हयात टॉपर आलेल्या पलक शर्मा, विधी अग्रवाल, आदेश देशमुख, ध्वनील पटेल, अभिषेक अग्रवाल या गुणवंत विद्यार्थ्यांचा खा. प्रफुल्ल पटेल यांच्या हस्ते स्मृती चिन्ह पदक व प्रशस्ती पत्र देऊन सत्कार करण्यात आला.
तसेच रूग्णालयात नि:शुल्क भोजन दान करणारी खालसा सेवा दल आणि वृक्षधरा फाऊंडेशन यांचा आणि मनोहर भाई पटेल संपादकीय पुरस्कार रुद्र सागर न्युज चे बबलू मारवाडे यांना, स्व. रामकिशोर कटकवार वृत्त वाहिनी पुरस्कार जय महाराष्ट्रचे राकेश रामटेके, स्व. हिरालाल जैन विकास वार्ता पुरस्कार हे. भास्करचे महेंद्र गजभिये, स्व. संतोष अग्रवाल स्मृती शोधवार्ता पुरस्कार तरुण भारतचे रविंद्र तुरकर यांना श्रमीक पत्रकार संघातर्फे उत्कृष्ट छायाचित्र पुरस्कार अजुर्नी मोरगाव चे डॉ. शरद मेश्राम यांना पण स्मृती चिन्ह प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला. या प्रसंगी आपल्या अध्यक्षीय भाषणात जि.प. अध्यक्ष पंकज रहांगडाले म्हणाले की, गोंदिया जिल्ह्यातील पत्रकार आपली सामाजिक चांधीलकी समजुन गुणवंत विद्यार्थ्यांचा आणि सामाजिक संस्थाचा सत्कार कार्यक्रम करतात हे माझ्या मते गौरखा स्पद बाब आहे.
श्रमिक पत्रकार संघातर्फे पत्रकार संघाचे अध्यक्ष हाजी अल्ताफ शेख यांनी कार्यक्रमाला उपस्थित पाहुण्याचा स्मृतिचिन्ह देऊन सत्कार केला. कार्यक्रमाचे संचालन श्रमिक पत्रकार संघाचे सचिव संजय राऊत आणि शालु कृपाले यांनी केले. तसेच आभार प्रदर्शन श्रमिक पत्रकार संघाचे कोषाध्यक्ष हरिश मोटघरे यांनी केले. कार्यक्रमाला यशस्वी करण्याकरिता श्रमिक पत्रकार संघाचे कार्यक्रमाचे संयोजक रवि सपाटे, महेंद्र बिसेन, महेंद्र माने, दिलीप पारधी, बाबाभाई शेख, नबिन अग्रवाल, मुरेश बेडे, मोहन पवार, सावन डोये, मुनेश्वर कुकडे, देवेंद्र रहांगडाले, नविन दहिकर, अमित गुप्ता, शाहिल भावडकर, गौरव बिसेन आदी ने प्रयत्न केले.