भंडारा पत्रिका / प्रतिनिधी तिरोडा : तिरोडा तहसीलदारांनी रेती चोरी प्रकरणात जप्त केलेला ट्रॅक्टर तहसील कार्यालयातून चोरी गेल्याची तक्रार तहसीलदारांनी पोलीस स्टेशन तिरोडा येथे दिल्यावरून तिरोडा पोलीस तपास करीत असताना तब्बल ५० दिवसांनी हा ट्रॅक्टर सापडला २५ जून २४ रोजी तहसीलदार तिरोडा यांनी बिरोली घाटावरून अवैध्यरित्या रेती चोरी करून नेत असलेला निळ्या रंगाचा स्वराज्य कंपनीचा पासीग न तात्पुरता नंबर असलेला ट्रॅक्टर चालक-मालक अतुल गिरधारी चिमूरकर राहणार केसलवाडा याचे कडून जप्त करून तिरोडा तहसील कार्यालयात जमा केला होता हा ट्रॅक्टर २६ तारखेचे पहाटे अडीच वाजता चे दरम्यान चार इस्मानी तिरोडा तहसील कार्यालयाचे गेट उघडून चोरी करून घेऊन गेल्याचे तहसील कार्यालयातील सीसीटीव्ही मध्ये दिसून आल्याने तहसीलदार गजानन कोकुड्डे यांनी तिरोडा पोलीस स्टेशनला तक्रारी दिली होती मात्र हा ट्रॅक्टर मिळून येत नव्हता यावरून पोलीस निरीक्षक अमित वानखेडे यांनी स्वत: लक्ष घालून ट्रॅक्टर शोधण्याचा प्रयत्न केला असता त्यांना गुप्त माहितीदारा कडून मिळालेले माहितीनुसार हा ट्रॅक्टर सरांडी गावाजवळील खर्डा कंपनी जवळ लपवून ठेवला असल्याची माहिती मिळाल्यावरून त्यांनी सहायक फौजदार मनोहर अंबुले व शिपाई शैलेश दमाहे यांना हा ट्रॅक्टर शोधून आणण्याचे आदेश दिल्यावरून १४ आॅगस्ट रोजी हा ट्रॅक्टर खर्डा फॅक्टरी जवळून ताब्यात घेऊन ट्रॅक्टर मालक अतुल गिरधारी चिमूरकर यास केसलवाडा येथून ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्याने त्याचे सह आणखी तीन इसमांनी हा ट्रॅक्टर तहसील कार्यालयातून चोरून नेल्याचे कबूल केल्यावरून चौघांनाही नोटीस देऊन सोडून देण्यात आले.