भंडारा पत्रिका/प्रतिनिधी तुमसर : पोलीस स्टेशन येथे दि. १९ आॅगस्ट २०२४ रोजी रक्षाबंधनाचे औचित्य साधून ह्यूमन राईट्स व रेड क्रॉस संस्थेच्या वतीने उपविभागीय पोलीस अधिकारी रश्मीता राव (डीवायएसपी), यांना राखी बांधून त्यांना कलकत्ता पिडीतास फास्ट ट्रॅक न्याय देण्यात यावा, या मागणीचे निवेदन देवून त्यांच्या मार्फत केंद्र सरकारला पाठविण्यात आले. निवेदनात कलकत्ता येथील आर. जी. आर. मेडिकल कॉलेज मधील महिला डॉक्टरवर निर्भया हत्याकांड पेक्षाही भयंकर अत्याचार व हिंसाचार दोन्ही गोष्टी समोर आल्या असून सदर घटना लांच्छनीय आहे, महिलांसाठी सुरक्षित जागांची कमतरता, संघटित सुरक्षा प्रोटोकॉल च्या अभावामुळे झालेल्या या अपराधाने आणि विध्वंसाने संपूर्ण राष्ट्राला धक्का दिला आहे. यात सर्वच समुदायातील महिला व मुली सुरक्षित नाहीत. दिवसेंदिवस अत्याचाराचे प्रमाण वाढतच चालले आहे.
शिक्षण, नोकरी याकरिता मुली व महिलांना घराबाहेर जावे लागते, महिला व मुली सुरक्षित नाहीत, करिता याकडे लक्ष देवून, या सर्व अत्याचारावर त्वरित आळा बसवावा, गुन्ह्याची काळजी पूर्वक फास्ट ट्रॅक तपास करून या विध्वंसक गुन्हेगारांवर कडक कारवाई करून फाशीची शिक्षा देण्यात यावी, पीडितेच्या कुटुंबाला योग्य अशी नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी ह्युमन राईट्सच्या विदर्भ सेक्रेटरी व रेड क्रॉस एक्झिक्युटिव्ह सदस्या मीरा भट्ट यांनी केली आहे. याप्रसंगी तुमसर पोलीस स्टेशनचे ठाणेदार हिवरे साहेब व सर्व कर्मचारी यांना राखी बांधून रक्षाबंधन साजरा केला. यावेळी आम्हाला ओवाळणी म्हणून आमच्या सर्व महिला, मुलींचे रक्षण करावे हीच विनंती करण्यात आली. यामध्ये ह्युमन राईट्स सेक्रेटरी व रेड क्रॉस सदस्या सुनीता पांडे, राजमुद्रा महिला समितीच्या अध्यक्ष, रेडक्रॉस सदस्या मीनल लिमजे, अंचल मेश्राम ह्युमन राईट्स, रेडक्रॉस सदस्यातसेच सर्व पदाधिकारी व सदस्य प्रामुख्याने उपस्थित होते.