भंडारा पत्रिका/प्रतिनिधी नागपूर : केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री सुर्यघर-मोफत वीज योजना अमलात आणली आहे. याअंतर्गत लाभाथीर्ना दरमहा ३०० युनिट नि:शुल्क वीज दिली जाणार आहे. याविषयी वीज ग्राहकांना माहिती व्हावी याकरिता महावितरणतर्फे नंदनवन भागात स्कुटर रॅलीच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली. महाल विभागचे कार्यकारी अभियंता समीर टेकाडे, यांच्या नेतृत्वात काढण्यात आलेल्या या स्कूटर रॅलीमध्ये अतिरिक्त कार्यकारी अभियंता धीरज बारापात्रे, सहायक अभियंते रोहिणी बाईस्कर, प्रशांत गिरीपुंजे, योगेश ईटनकर, प्रविण तेलंग, श्रीकांत बहादुरे, विक्रम उराडे यांच्यासह उपविभागातील तांत्रिक व अतांत्रिक कर्मचारी सोबतच शाळा आणि महाविद्यालयीन विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या रॅलीदरम्यान नंदनवन आणि सभोवतालच्या भागातील नागरिकांना या योजनेची माहिती देत पर्यावरण पुरक वीजेचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले.
प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेत केंद्र सरकारकडून छतावरील सौर ऊर्जा निर्मितीचे रूफ टॉप सोलर प्रकल्प बसविणाºया वीज ग्राहकांना ७८ हजार रुपयांपर्यंत अनुदान दिले जाते. एक किलोवॅट क्षमतेच्या प्रकल्पाला ३० हजार रुपये, दोन किलोवॅट क्षमतेच्या प्रकल्पाला ६० हजार रुपये व तीन किलोवॅट किंवा त्यापेक्षा अधिक क्षमतेच्या प्रकल्पाला ७८ हजार रुपये अनुदान मिळते. छतावरील सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्पात निर्माण झालेली वीज घरामध्ये वापरायची, प्रकल्पात गरजेपेक्षा अधिक वीज निर्माण झाल्यामुळे वीजबिल शून्य येते तसेच अतिरिक्त वीज महावितरणला विकता येते याशिवाय, सौर ऊर्जेमुळे पर्यावरण रक्षणाला मदत होते तसेच ग्राहकांनाही आर्थिक लाभ होतो. ग्राहकाच्या वीज आणि पैसे बचतीसोबतच पर्यावरण पुरक असलेल्या पंतप्रधान सुर्यघर-मुμत बिजली योजनेत सहभागी होऊन महावितरणच्या रुफ टॉप सोलरचा लाभ अधिकाधिक ग्राहकांनी घेण्याचे आवाहन या रॅली दरम्यान करण्यात आले.