भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : आज दिनांक २० आॅगस्ट २०२४ रोज मंगळवारला भंडारा जिल्हा महिला राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टी तर्फे कोलकाता येथील आरजी वैद्यकिय महाविद्यालय येथे डयुटीवर कार्यरत असलेल्या महिला डॉक्टरची हत्या करण्यात आली. ही घटना अत्यंत दुर्दैवी व निंदनिय आहे. गुन्हा घडून ८ दिवस लोटूनही याबाबत काहीच कारवाई झालेली नाही. तपासयंत्रणांची कारवाई शून्य आहे. ही अतिशय गंभीर बाब आहे. या घटनेतील दोषींवर लवकरात लवकर आणि कडक कारवाई करण्यात यावी व पिडीत डॉक्टर महिलेला न्याय मिळवून देण्यात यावा याकरीता निवेदन देण्यात आले तसेच कारवाई न झाल्यास भंडारा जिल्हा महिला राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टी तर्फे जिल्हाभर तिव्र आंदोलन करण्यात येईल असा इशाराही देण्यात आला. याप्रसंगी प्रामुख्याने उपस्थितांमध्ये महिला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या जिल्हाध्यक्षा श्रीमती सरिता मदनकर, शहर अध्यक्ष सौ. मंजुषा बुरडे, तालुका अध्यक्ष सौ. किर्ती गणविर, निशा राऊत, अनिता महाजन, धनवंता बोरकर, लता मासूरकर, गीता मेश्राम, लता मेश्राम, जयश्री मेश्राम, विशाखा राऊत, भारती निमजे, रेणुका धकाते, रजनी कढव व मोठ्या संख्येने महिला राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.