भंडारा पत्रिका/प्रतिनिधी तिरोडा : शेतकरी शेतमजूर यांचे विविध मागण्यांकरिता शासनाकडे वारंवार मागणी करुनही या मागण्यांकडे दुर्लक्ष होत असल्यामुळे १२ आॅगस्ट रोजी जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, उपविभागीय अधिकारी तिरोडा, तहसीलदार तिरोडा, पोलीस स्टेशन तिरोडा येथे निवेदन देऊन आज दिनांक २० आॅगस्ट रोजी तिरोडा तहसील कार्यालयासमोर शेतकरी शेतमजुरांनी आंदोलन सुरू केले असून सुरुवातीला साखळी उपोषण व नंतर आमरण उपोषण करणार असल्याची माहिती शेतकरी नितेश खोब्रागडे यांनी दिली आहे. शेतकरी शेतमजुरांनी आपले विविध मागण्या करिता पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचे नावे दिलेले निवेदनात आपल्या विविध मागण्या ज्यात प्रामुख्याने शेतकºयांचे भंडारा गोंदिया जिल्ह्यातील मुख्य पीक धानास योग्य भाव मिळावा, शेती करता २४ तास मोफत पाण्याची व्यवस्था करावी, २४ तास मोफत वीज पुरवण्यात यावी,
शेतकºयांचे मुलांना पहिली ते पदवी व एमपीएससी सारख्या परीक्षेत मोफत शिक्षण द्यावे, शेतकरी शेतमजु- रांना तीन लक्ष रुपये घरकुला करता द्यावे या प्रमुख मागण्यांसह ३२ मागण्यांचे निवेदन १२ आॅगस्ट रोजी देऊन या मागण्यांवर विचार न झाल्यास २० आॅगस्ट पासून तहसील कार्यालय तिरोडासमोर आंदोलन करण्याचा इशा- रा दिल्याप्रमाणे आज दिनांक २० आॅगस्ट रोजी तहसील कार्यालय तिरोडासमोर जिल्ह्यातील शेतकरी नितेश खोब्रागडे, शेखर भेलावे, गोलू कुंभरे, वासुदेव लाडे, देवीलालजी उके, संतोष चाचेरे, यशवंत राणे, शांताबाई बावनकर, सहेनबाई कोहळे, जिजाबाई वालदे, देवांगनाबाई वाघाडे यांच्यासह सुमारे दोनशे शेतकरी शेतमजुरांनी तिरोडा तहसील कार्यालयासमोर आंदोलन सुरू केले असून मागण्या मान्य होईपर्यंत आमचे आंदोलन सुरूच राहील अशी माहिती शेतकरी नेते नितेश खोब्रागडे यांनी दिली आहे.