भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : तालुक्यातील खमारी, आमगाव,धारगाव, जिल्हा परिषद क्षेत्राची काँग्रेस पक्षाची बैठक आमगाव येथील जयहिंद सभागृहात पार पडली. बैठकीत बुथ समीती, बिएलओ, महिला बुथ समीतीचा आढावा घेण्यात आला. यावेळी पक्षाचे दोनशेचेवर कार्यकर्ता उपस्थित होते. सदर बैठकित ‘निर्धार पक्का पंजावर शिक्का’, काँग्रेसच्या पंजावर शिक्का मारायचा असा एक मताने ठराव पास करण्यात आला. बैठकीला उमेदवारी मागणारे उमेदवार सागर गणविर, राजकपुर राउत, अरविंद भालाधरे, मनोज बागडे, पुजा ठवकर, पृथ्वी खांडेकर उपस्थित होते.
बैठकित भंडारा विधानसभा काँग्रेस पक्षालाच का पाहीजे यावर मार्गदर्शन सागर गणविर यांनी केले. या बैठकीला सर्व उमेदवारांनी मार्गदर्शन करुन भंडारा विधानसभा काँग्रेस पक्षालाच देण्यात यावी असा ठराव एकमताने पारीत करण्यात आला. बैठकीला भंडारा तालुका अध्यक्ष प्यारेलाल वाघमारे, विधानसभा समन्वयक सुभाष आजबले, दुग्ध संघाचे जिल्हाध्यक्ष रामलाल चौधरी, अनुसूचित जातीचे तालुका अध्यक्ष राजेश मेश्राम, घनश्याम भांडारकर, मंगेश हुमने, स्वप्निल आरीकर, जिल्हा परिषद प्रमुख धनराज शेंडे, रवी तिरपुडे, कुंडलीत मोटघरे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.