भंडारा पत्रिका/प्रतिनिधी लाखनी : कत्तलीचा उद्देशाने गोवंशाची विनापरवाना वाहतूक करणारा ट्रक लाखनी पोलिसांनी राजेगाव एमआयडीसी बस स्थानकाजवळ सोमवारी (ता. १९) ला मध्यरात्री ३ वाजताच्या सुमारास पकडला त्यात ३१ गोवंशांची निर्दयतेची वागणूक देताना आढळून आल्याने ट्रक चालक व मालकाविरुद्ध लाखनी पोलिसात गुन्हा दाखल केला असून ट्रक चालक ट्रक सोडून घटना स्थळावरून पसार झाल्याने त्याचा शोध घेणे सुरु आहे. लाखनी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक अशोक बोडे, पोलीस हवालदार दिगांबर तलमले पोलीस शिपाई नितेश घोनमोडे, चालक पोलीस हवालदार लोकेश ढोक हे रात्र गस्त पेट्रोलिंग वर असताना मध्यरात्री ३ वाजताच्या सुमारास साकोली कडून भंडारा कडे जाणारा टाटा ९०९ ट्रक क्र. ट्रक क्रमांक एम एच ०४ एफ जे ७२३२ या ट्रकमधून गोवंशाची वाहतूक करीत असल्याची गोपनीय माहिती मिळाली.
माहितीच्या आधारे राजेगाव एमआयडीसी बस स्थानकाजवळ पेट्रोलिंग पथक दबा धरून बसले. गाडी भरधाव वेगाने येत असल्याचे पाहून चालकास ट्रक थांबविण्यास संगितले. मात्र पोलिस इशाºयाला न जुमानता त्याने ट्रक भरधाव वेगाने पुढे नेण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याला थांबवून ट्रकची तपासणी केली असता त्यांत ३१ गोवंश विनापरवाना पिडादायक एकमेकावर भरगच्च कोंबुन निर्दयतेची वागणूक देत कत्तलखान्याकडे नेत असल्याचे आढळले. तर पोलिसांना पाहून ट्रक चालक घटना स्थळावरून ट्रक सोडून पसार झाला पोलिसांनी घटनास्थळावरून एक लाख ३० हजाराचे गोवंश व ट्रक ६ लाख असा ७ लाख ३० हजाराचा मुद्देमाल जप्त केला असून गोवंशाना बरडकिन्ही येथील गोशाळेत पालन पोषणाकरिता पाठविण्यात आले असून पोलीस शिपाई नितेश घोनमोडे यांच्या तक्रारीवरून लाखनी पोलिसांनी ट्रक चालक व मालक यांच्याविरुद्ध प्राणी संरक्षण अधिनियम, प्राण्यास निर्दयतेने वागविण्याचा कायदा व महाराष्ट्र पोलीस अधिनियमानुसार दाखल केला असून घटनेचा अधिक तपास सहाय्यक पोलीस अधीक्षक सुशांत सिंह, पोलीस निरीक्षक हृदयनारायण यादव यांच्या मार्गदर्शनात पोलीस हवालदार दिगांबर तलमले करीत आहेत.