भंडारा पत्रिका/प्रतिनिधी गोंदिया : ग्राम सेवकाला गावातील नागरिकांनी चांगलाच चोप दिल्याचा धक्कादायक प्रकार सोमवारी (ता.१९) गोंदिया तालुक्यातील नवरगाव कला येथे उघडकीस आला. सदर प्रकारामुळे प्रशासकीय वतुर्ळात एकच खळबळ उडाली असुन परिसरात चर्चेला उधाण आले आहे. श्री चौधरी असे वादग्रस्त ग्रामसेवकाचे नाव असून तो सध्या गोंदिया तालुक्यातील नवरगाव येथे पदस्त आहे. संपूर्ण ग्रामपंचायत प्रशासन संपात सहभागी असताना तो सोमवार (ता.१९) च्या सायंकाळी ८ वाजताच्या सुमारास गावातील एका महिलेच्या घरात जावून त्याने तिचा हात पकडण्याचा प्रयत्न केला. अश्यात महिलेने आरडाओरड केल्याने तिच्या घरातील मंडळी धावून आली. सदर प्रकार उघडकीस येताच गावातील नागरिकांनी ग्रामसेवकाला भर चौकात चांगलाच चोप दिला असल्याची माहिती आहे. अखेर पोलिसांनी मध्यस्थी करीत त्याला नागरिकांच्या तावडीतून सोडविले.
सदर प्रकाराला घेवून मध्यरात्री पर्यंत ग्रामीण पोलीस ठाण्यात राडा सुरू होता अशी गुप्त महिती प्राप्त झाली. परंतु सदर प्रकरणाची अद्यापही तक्रार झाली नसल्यामुळे विविध चर्चांना उधाण आले आहे. या संबंधात गावातील सरपंच व सदर ग्रामसेवकांची प्रतिक्रीया घेण्याचा प्रयत्न केला असता दोन्ही व्यक्तीनी कोणताही प्रतिसाद दिला नाही. मात्र सदर घटनेमुळे प्रशासकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली असुन प्रशासनाची मान खाली घालणाºया ग्रामसेवकावर गटविकास अधिकारी कोणती कारवाही करतात? याकडे गावकºयांचे लक्ष लागले आहे.