भंडारा पत्रिका/प्रतिनिधी तुमसर : तुमसर येथे शिवसेना बैठकीत संघटनात्मक वाढविण्यासाठी कार्य कर्तव्य, युवासेना पदाधिकारी कार्य कर्तव्य, विधानसभा निवडणुकीच्या शाखा बूथ कार्य कर्तव्यचे मार्गदर्शन जिल्ह्याच्या पदाधिकाºयांनी केले. तसेच ठाणे जिल्ह्यातील गाव बदलापूर येथील आदर्श विद्यामंदिर या शाळेत दोन निरागस अल्पवयीन चार ते सहा वर्षाचे मुलीवर तेथील कर्मचाºयांनी अत्याचार केले. सदर घटना १३ आॅगस्ट रोजी बाह्य सरकारच्या काळात महिलांवर घडली असून दिवसेंदिवस अत्याचार होत आहे. या घटनेचा भंडारा जिल्हा शिवसेनेच्या वतीने जाहीर निषेध व्यक्त करीत तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) जिल्हा प्रमुख रवी वाढई, युवासेना जिल्हा अधिकारी जितेंद्र उईके, जिल्हा समन्वयक मनोज चौबे, वाहतूक सेना जिल्हा प्रमुख प्रमोद मेश्राम, युवासेना तालुका अधिकारी पवन खवास, विजय पाटील, शिवसेना विभाग प्रमुख अमित एच मेश्राम, शाखा प्रमुख रोशन ढोके, निखिल बिसेन, भूषण पाटील, सचिन नेवारे, लोकेश चावके, प्रशांत चारमोडे, मनोहर गायधने, वामन पडोळे, सत्यनारायण कामथे, प्रवीण गुप्ता, कुंदन धुर्वे, पुंडलिक वाघमारे, अश्विन मेश्राम, लंकेश तिजारे, योगेश निनावे सह शिवसैनिक उपस्थित होते.