भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गोंदिया: मी नेहमी आपल्या संबोधनात सांगत असतो की छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील शासन व्यवस्था कश्या प्रकारे कार्य करित असे आज महाराज असतांना अश्या प्रकारे घटना घडल्या असत्या तर गुन्हेगारांच्या पायाखालचे चौरंग काढून घेण्यात आले असते पण अश्या प्रशासनाची अंमलबजावणीच कुठे ही होतांना मला दिसत नाही. मुळात आज प्रशासनाचा धाकच गुन्हेगारावर राहिलेला नाही त्यामुळेच प. बंगालच्या कोलकाता आणि महाराष्ट्रातील बदलापुर, आकोला सारख्या घटतांना दिसतात, पुरोगामी महाराष्ट्रात अश्या घटना ही येथील प्रशासनाला लाजिरवाणी बाब असल्याचे वक्तव्य महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गोंदियात मनसे पदाधिका-यांना संबोधित करतांना व्यक्त केले. या प्रसंगी व्यासपीठावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे, अमित ठाकरे, गोंदिया जिल्हा संगठक रितेश गर्ग, गोंदिया जिल्हाध्यक्ष मनिष चौरागडे, मन्नु लिल्हारे, तालुका अध्यक्ष मुकेश मिश्रा आदि उपस्थित होते.
पुढे राज ठाकरे म्हणाले की प्रशासनाच्या अश्या गळचेपी भूमिकेमुळेच येथील पोलिसांना पण आपले काम मनमोकळेपणाने करण्याची सुट राहिलेली नाही, यांनी इतका दबाव पोलिसांवर निर्माण केलं आहे की पोलिसांना ही वाटतं की काही कमी जास्त झालं की बळी आपलच जाणार प्रशासन आपले हात वर करणार त्यामुळे यांच्या या अश्या कारभारामुळे पोलिसांचे हात बांधले गेले आहे. माझे तर येथे उपस्थित पोलिसांना पण म्हणणे आहे की दया एकदा माझया हातात सत्ता मग दाखवितो की कसे शासन प्रशासन चालविला जाते. यांच्या अश्या निगरगट्ट प्रशासनामुळे संपूर्ण देशात महाराष्ट्राची बदनामी होत आहे. पण येथील शासनाला याचं काहीही सोयरसुतक राहिलेला नाही असे दिसतो आहे. एक एसआयटी नेमून दिली, जलदगती न्यायालयात प्रकरण दाखल केले की झाले मोकळे अश्या प्रकारे शासन व्यवस्था चालतो का असा प्रश्न ही राज ठाकरे यांनी महाराष्ट्रातील मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना उद्देशून या प्रसंगी विचारला.आज महाराष्ट्रातील राजकारणाचा काय विचका करून ठेवलंय, एका एका आमदारांवर ५० खोके घेवून स्वत:ला विकल्या गेल्याचे आरोप होतोय, असं महाराष्ट्रात या पूर्वी कधीच ऐकायला मिळत नव्हते पण आज हे सगळं सर्रास सुरू आहे.