भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : जिल्ह्यातील धान खरेदी संस्थांच्या समस्या संदर्भात आ.डॉ. परिणय फुके यांनी राज्याचे अन्ननागरी पुरवठा मंत्री ना. छगन भुजबळ यांची भेट घेवुन अनेक समस्यांकडे लक्ष वेधले. काही दिवसापुर्वी सह्याद्री अतिथीगृहावर धान खरेदी केंद्राच्या समस्या निकाली काढण्यासाठी बैठक घेण्यात आली होती परंतु सदर बैठकीत आपण घेतलेल्या निर्णयाची अजूनपर्यंत अंमलबजावणी झालेली नाही. त्यामुळे जिल्ह्यातील धान खरेदी संस्थांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. खरीप हंगाम २०२३-२४ मध्ये धानाची उचल लवकर न झाल्यामुळे (२ महिन्याच्या आत) जवळपास प्रति क्विंटल ५ किलो घट आलेली आहे. परंतु सध्याच्या जी.आर नुसार धानाची उचल २ महिन्यात झाली नाही तर ०.५ % घट मिळते. ही घट अत्यल्प आहे त्यामुळे दरमहा ०.५ % घट मंजूर करण्यात यावी. महामंडळाकडून धानाची उचल कधीही २ महिन्यात करण्यात येत नाही त्याचा भुर्दंड संस्थांना भोगावा लागतो. २०२०२१ पर्यंत कमिशन १.५ टक्क्यापर्यंत होते ते कमी करून १ % करण्यात आले परंतु सध्याची परिस्थिती लक्षात घेता धान खरेदी संस्थांना पणन मंडळातर्फे काम वाढविण्यात आले आहेत. त्यात शेतकºयांचे सातबारा आॅनलाईन करणे, लॉट एन्ट्री करणे, व्हेरिफिकेशन करणे इत्यादी कामे वाढविण्यात आली त्यामुळे त्याचा मोबदला २ % करण्यात यावा.
धान खरेदी संस्थांचा ठएटछ पोर्टलचा हाताळण्याचा खर्च धान खरेदी संस्थावर न लादता तो मार्केटिंग फेडरेशन यांनी स्वत: उचलण्यात यावा. सध्याच्या परिस्थितीत गोडाऊन भाडे फार महाग झालेले असून सध्या प्रति क्विंटल २.४० रुपये प्रमाणे गोदाम भाडे देण्यात येते. हा रेट २०१४ चा असून आता २०२४ सुरु असून त्यामानाने भाडे सध्याच्या परिस्थितीनुसार कमीत कमी ५ रुपये प्रमाणे किंवा सा.बा. विभागाच्या उरफ रेट नुसार देण्यात यावा. सदर गोडावून भाडे हे २ महिन्याचे मिळत असून धान साठा गोदामात जेवढे महिने राहील त्याप्रमाणे भाडे देण्यात यावे. व हमाली/अनुषंगिक खर्च प्रति क्विंटल २०१८-१९ पासून ११.७५ रुपये प्रमाणे देण्यात येत आहे. परंतु आता २०२४ सुरु असून वाढत्या महागाईचा विचार करून प्रति क्विंटल २० रुपये करण्यात यावा यांसह विविध विषयांवर यावेळी चर्चा करण्यात आली. याप्रसंगी भाजपा भंडारा जिल्हाध्यक्ष प्रकाश बाळबुधे, जिल्हा नियोजन समिती विशेष निमंत्रित सदस्य नेपाल रंगारी आणि विविध मान्यवर मंडळी उपस्थित होते.