भंडारा पत्रिका / प्रतिनिधी तिरोडा : आज दिनांक २१ आॅगस्ट रोजी एससी एसटी ओबीसी संघटनांनी सर्वोच्च न्यायालयाने दिलेले आरक्षण विरोधी निर्णया विरोधात भारत बंदची हाक दिली होती या हाकेस ओ देत तिरोडा तालुक्यात सर्वत्र शांततेत बंद पाळण्यात आला. नुकताच सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार अनुसूचित जाती जमातीचे आरक्षणात क्रिमीलेलची अट प्रस्तावित केल्याने तसेच उपवर्ग तयार केल्याने जवळपास या समाजाचे आरक्षण संपुष्टात येण्याची शक्यता निर्माण झाल्याने या निर्णया विरोधात केंद्र शासनाने अध्यादेश काढून क्रिमिलियर अट रद्द करावी व मूळ आरक्षण कायम ठेवावे या मुख्य मागणी सह इतर मागण्या संबंधात आज दिलेल्या भारत बंदचे हाकेस तिरोडा तालुक्यात चांगला प्रतिसाद मिळून सकाळपासूनच तालुक्यातील दुकाने, शाळा महाविद्यालये बंद राहल्याने तसेच दुपारी अनेक गावातून मोटर सायकल द्वारे आपल्या संघटनेचे झंडे लावून नागरिकांनी तिरोडा शहरात येऊन मोर्चा काढला तसेच या बंदमध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष व राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते ही सामील झाले तसेच जुने नगरपरिषदेचे कार्यालयासमोर सर्वच संघटनांचे नेत्यांनी सर्वोच्च न्यायालयाचे या निर्णया विरोधात सविस्तर माहिती देऊन हा निर्णय रद्द करावा असे मार्गदर्शन केल्याने यामुळे नागरिकांचे व व्यापारी प्रतिष्ठांनी सर्वत्र बंद राहिल्याने तालुक्यात शंभर टक्के बंद यशस्वी झाला.