साकोली शहर कडकडीत बंद

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी साकोली: न्यायालयाच्या निर्णय विरोधात विविध संघटनांचे बुधवार २१ आॅगस्ट या भारत बंद मोहिमेच्या समर्थनार्थ साकोली शहर ९०% टक्के यशस्वीरित्या बंद ठेवून विविध संघटनांनी शहरात मोर्चा काढून आपला रोष व्यक्त केला. जूने पंचायत समिती गांधी चौकात मोचार्चे रूपांतर सभेत झाले. बिरसा फाइटर चे सुरेश पंधरे, आॅल इंडिया पीपल फेडरेशनचे केशव भलावी, बि डी खांडवाये, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा संघटक डी जी रंगारी, भारतीय बौद्ध महासभेचे साकोली अध्यक्ष विलास मेश्राम, समता सैनिक दलाचे साकोली कमांडर कैलास गेडाम, बहुजन समाज पाटीर्चे मनोज कोटांगले बिट्टू गजभिये, तालुका स्मारक समितीचे दीपक साखरे , अशोक रंगारी, मूलनिवासी संघटनेचे शब्बीर पठाण, काँग्रेसचे दिलीप मासुरकर, बामसेफचे कागदराव रंगारी, कार्तिक मेश्राम, माजी सभापती रेखा वासनिक, सामाजिक कार्यकर्ते चूनीलाल वासनिक, जगदीश रंगारी, नगरपरिषद चे माजी उपाध्यक्ष जगन उईके, इत्यादी मान्यवरांच्या उपस्थितीत रॅली काढून सभा संपन्न झाली याप्रसंगी मनोज कोठांगले प्रदीप मासुरकर कैलास गेडाम विलास मेश्राम अशोक रंगारी व इतर मान्यवरांनी सुप्रीम कोटार्ने जो निर्णय दिला आहे व तो कसा घटनाबाह्य आहे, व आरक्षणाची गरज याविषयी आपल्या भाषणातून पटवून दिलेयाप्रसंगी साकोली पोलीस निरीक्षक संजय गायकवाड यांनी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी अतिरिक्त पोलीस, वाहतूक पोलीस व महिला पोलीसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. सर्वोच्च न्यायालयाने ०१ आॅगस्टच्या निर्णयावर अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती प्रवर्ग निर्माण व क्रिमिलियरची शर्त लागू करण्याचा निर्णय दिला आहे.

या निर्णयामुळे अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती यांना मिळणा-या आरक्षणाला नुकसान होऊ शकतो. निर्णयाच्या विरोधात विविध संघटनेकडून साकोली शहर बंद करण्याचा निर्णय सर्व सामाजिक संघटनांनी घेतला. सर्व व्यापारी प्रतिष्ठान कडकडीत बंद ठेवण्यात आले. भारतीय बौद्ध महासभा, वंचित बहुजन आघाडी , डॉ. बाबासाहेब आंबेडकर तालुका स्मारक समिती, आदिवासी मुळनिवासी, नॅशनल आदिवासी पिपल्स फेडरेशन संघटना, कौमी एकता मंच, प्रबोधनकार कला साहित्य समिती, पंचशील महिला मंडळ, समता सैनिक दल, महामाया समिती, सावित्रीबाई महिला मंडळ, , बहुजन समाज पार्टी, बामसेफ संघटना, विविध सामाजिक संघटन, राजकीय पक्ष, बुद्धिजीवी वर्ग तथा समस्त नागरिकांनी या मोचार्चे आयोजन केले होते. कार्यक्रमाचे संचालन प्रबोधनकारकला साहित्य संघटनेचे अध्यक्ष भावेश कोटांगले यांनी केले तर आभार तालुका स्मारक समितीचे व्यवस्थापक सोनू राऊत यांनी मानले सर्व संघटनांच्या पदाधिकाºयांच्या उपस्थितीत उपविभागीय अधिकारी अश्विनी मांजे यांना निवेदन देण्यात आले. यात साकोलीकरांकडून भारत बंद च्या समर्थनार्थ साकोली शहर कडकडीत बंद ठेवून सर्वांनी सहकार्य केले

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *