न्यायालयाच्या निर्णयाविरोधात दलित संघटना आक्रमक

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : सर्वाेच्च न्यायालयाच्या अनुसूचित जाती आणि जमातीच्या आरक्षण उपवर्गीकरणाच्या निर्णया विरोधात पुकारण्यात आलेल्या ‘भारत बंद’ भंडारा शहरात संमिश्र प्रतिसाद दिसुन आला. सकाळी ११ वाजेपासून शहराच्या विविध भागांतून मोठया संख्येने नागरिक न्यायालयाच्या निर्णयाविरोधात घोषणाबाजी देत उत्स्फूर्तपणे त्रिमुर्ती चोकात जमा झाले. येथे झालेल्या सभेतून सर्वाेच्च न्यायालय आणि केंद्र सरकारवर सडकून टीका करण्यात आली.तत्पुर्वी शास्त्री चौक ते त्रिमुर्ती चौक दरम्यान मोर्चा काढण्यात आला त्यामध्ये हजारोच संख्येने नागरीक सहभागी झाले होते. ज्या मार्गाने शहरातुन मोर्चा काढण्यात आला त्या मार्गावरील व्यापारी प्रतिष्ठाने बंद ठेवण्यात आली होती मात्र मोर्चा पुढे जाताच अनेक व्यापाºयांनी आपली प्रतिष्ठाने पुन्हासुरू केली. अनुसूचित जातीसाठी असलेले आरक्षण देताना त्यात वर्गीकरण करण्याचा अधिकार राज्यांना असल्याचा महत्त्वपूर्ण निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला.

हा निकाल देताना सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील सातसदस्यीय घटनापीठाने अनुसूचित जाती हा एकसंघ गट नसून त्यातील विविध जातींमध्ये विषमता असल्याचे निरीक्षण नोंदविले. सोबतच अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींमधील आरक्षणाचा लाभ योग्य घटकांपर्यंत पोहोचवण्यासाठी या वर्गातही ‘क्रीमिलेयर’ लावण्याची गरज असल्याचे मत सर्वोच्च न्यायालयाने दिले. याविरोधात दलित आणि आदिवासी संघटनांनी बुधवारी ‘भारत बंद’ ची हाक दिली. सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय मागे घ्यावा, अशी मागणी होत आहे. या निर्णयामुळे अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींच्या घटनात्मक अधिकारांचे उल्लंघन होत असल्याचे आरक्षण बचाव संघर्ष समितीचे म्हणणे आहे. या भारत बंदला बहूजन समाज पार्टी, वंचित बहूजन आघाडी, भारत मुक्ती मोर्चा,बीआरएसपी, स्वाभिमानी शेतकरी संघटना,आम आदमी पक्ष,कॉंग्रेस पक्ष यांच्यासह विविध दलित आणि आदिवासी संघटनांसह बहुतांश विरोधी पक्षांनी पाठिंबा दिला आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *