भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : महाराष्ट्रात पुन्हा महिला सुरक्षेचा प्रश्न उद्भवला असून शाळेत शिकणाºया दोन अल्पवयीन मुलींवर तेथीलच शिपाई असलेल्या नराधमाने लैंगिक अत्याचार करण्याची दुर्दैवी घटना ठाणे जिल्ह्यातील बदलापूर येथील शाळेत घडली आहे. या घटनेनंतर महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातील समाजमन सुन्न झाले असून संतापाची लाट उसळत आहे. सदर शिपाई असलेल्या नराधमास फाशीची शिक्षा देण्याची मागणी भंडारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षातर्फे करण्यात आली. ठाणे जिल्ह्यातील बदलापूर येथील नामांकित असलेली आर्दश विद्या मंदीर या शाळेत शिकणाºया दोन निरागस मुली ज्यामध्ये एक तीन वर्ष आठ महीने तर दुसरी सहा वर्षाची मुलगी असून दोघींवर शाळेतच कार्यरत असलेल्या शिपायाने अत्याचार केल्याच्या निषेधार्थ भंडाराजिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. दोन्ही मुलींवर आत्याचार करणाºया नराधम शाळेतला शिपाई आरोपी अक्षय शिंदे याच्यावर फास्ट ट्रॅक कोर्टाच्या माध्यातून फाशीची शिक्षा करण्यात यावी याकरीता भंडारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जिल्हाधिकारी यांच्यामार्फत निवेदन पाठविण्यात आले.
सदर मागणीवर त्वरीत कार्यवाही केली नाही तर पुन्हा महाराष्ट्र भरात आंदोलन करण्यात येईल असा कडकडीचा इशारा या निवेदनाच्या माध्यमातून शासनाला देण्यात आला आहे. निवेदन देतांना भंडारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष किरण अतकरी, विधानसभा अध्यक्ष अजय मेश्राम, महिला जिल्हाध्यक्ष अनिता गजभिये, मोहाडी तालुका अध्यक्ष उषा रामटेके, जिल्हा सचिव निलिमा रामटेके, भंडारा शहर अध्यक्षा शाहिना खान, लता बावनकुळे, साहील खान, मोहाडी तालुका अध्यक्ष श्याम कांबडे, जिला उपाध्यक्ष प्रफुल्ल जामघणे, जिला उपाध्यक्ष गुड्डू बांते, सामाजिक कार्यकर्ता किशोर मुलुंडे, जिला उपाध्यक्ष मधुकर भुपे, जिला अध्यक्ष ओबीसी सेल संजय नासरे, सुकराम अतकरी तसेच शहर अध्यक्ष मधुकर चौधरी इत्यादी पक्षाचे पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.