भंडारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे बदलापूर येथील घटनेचा निषेध

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : बदलापूर येथील एका नामांकित शाळेत शिकणाºया साडेतीन वर्षाच्या दोन मुलींवर लैंगिक अत्याचार करण्यात आला. या घटनेने संपुर्ण महाराष्ट्र हादरला असून महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. या घटनेचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे निषेध करण्यात आला. दोषीवर कठोर करवाई करण्याबाबत फलक हातात घेवून नारा देत निषेध व्यक्त करण्यात आला. महाराष्ट्र शासनाने अशा घटनांना आळा बसविणे गरजेचे आहे. याबाबत ठोस उपाययोजना करुन मार्गदर्शक तत्वे लागू करण्यात यावी. ज्याचे पालन करणे सगळ्यांना बंधनकारक असेल. अशा प्रकारे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे या घटनेचा निषेध व्यक्त करण्यात आला.

यावेळी उपस्थितांमध्ये जिल्हाध्यक्ष नाना पंचबुध्दे व प्रदेश महासचिव धनंजय दलाल, प्रदेश सचिव अ‍ॅड. जयंत वैरागडे, माजी नगरसेवक अ‍ॅड. विनयमोहन पशिने, माजी नगरसेवक महेंद्र गडकरी, विजय सावरबांधे, महिला जिल्हाध्यक्ष सरिताताई मदनकर, डॉ. रविंद्र वानखेडे, यशवंत सोनकुसरे बाबुराव बागडे, नरेंद्र झंझाड, आरजु मेश्राम, सौ. रत्नमाला चेटुले, डॉ. नुतन कुर्झेकर, राजु सलाम पटेल, शेखर (बाळा) गभने, अ‍ॅड. नेहा शेंडे, नागेश भगत, हेमंत महाकाळकर, हरीष तलमले, शैलेश मयुर, विजय सावरबांधे, मंजुषा बुरडे, किर्ती गणविर, रजनिश बन्सोड, अश्विन बांगडकर, राजेश डोरले, लोकेश नगरे, नरेंद्र बुरडे, प्रभाकर बोदेले, धनंजय ढगे, शालिक कागदे, उमेश ठाकरे, मनिष वासनिक, राजु साठवणे, हितेश सेलोकर, प्रणय मोटघरे, अजय गिदमारे, वामन शेंडे, मंगेश थोटे, मेगराज थोटे व फार मोठया संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *