राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे ‘जनसन्मान यात्रेची’ जय्यत तयारी

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा :राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या भंडारा व पवनी तालुक्यातील कार्यकर्त्यांची बैठक जिल्हाध्यक्ष नानाभाऊ पंचबुध्दे व प्रदेश महासचिव धनंजय दलाल, प्रदेश सचिव अ‍ॅड. जयंत वैरागडे, माजी नगराध्यक्ष अ‍ॅड. विनयमोहन पशिने, माजी नगराध्यक्ष महेंद्र गडकरी, विजय सावरबांधे, महिला जिल्हाध्यक्ष सरिताताई मदनकर, डॉ. रविंद्र वानखेडे, यशवंत सोनकुसरे यांच्या मार्गदर्शनात व प्रमुख उपस्थितीत घेण्यात आली. दि. ०१ सप्टेंबर २०२४ ला होणा-या जनसन्मान यात्रेत महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री ना अजितदादा पवार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष खा.प्रफुल पटेल, तसेच प्रांताध्यक्ष खा.सुनिल तटकरे, यांच्या उपस्थितीत होणार आहे. त्याकरीता या कार्यक्रमाची रुपरेषा ठरविण्यात आली. यावर नियोजन समिती तयार करण्यात आली. तसेच जनसन्मान यात्रा यशस्वी करण्याकरीता कामाला लागावे असा ठराव घेण्यात आला. असे मार्गदर्शन धनंजय दलाल यांनी कार्यकर्त्यांना केले. तसेच बदलापूर येथे दोन चिमुकल्या मुलींवर अत्याचार करण्यात आला.

त्या घटनेचा राष्ट्रवादी काँग्रेसपार्टी तर्फे निषेध करण्यात आला. व दोषींवर कठोर करवाई करण्यात यावी असे निवेदन देण्यात आले. याप्रसंगी प्रमुख उपस्थितांमध्ये सर्वश्री बाबुराव बागडे, नरेंद्र झंझाड, आरजु मेश्राम, सौ. रत्नमाला चेटुले, डॉ. नुतन कुर्झेकर, राजु सलाम पटेल, शेखर (बाळा) गभने, अ‍ॅड. नेहा शेंडे, नागेश भगत, हेमंत महाकाळकर, हरीष तलमले, शैलेश मयुर, विजय सावरबांधे, मंजुषा बुरडे, किर्ती गणविर, रजनिश बन्सोड, अश्विन बांगडकर, राजेश डोरले, लोकेश नगरे, नरेंद्र बुरडे, प्रभाकर बोदेले, धनंजय ढगे, शालिक कागदे, उमेश ठाकरे, मनिष वासनिक, राजु साठवणे, हितेश सेलोकर, मुशताक सलाम, प्रदीप सुखदेवे, प्रफुल राघुते, शंकररावजी रघुते, धनवंता बोरकर, गीता मेश्राम, जुमाला बोरकर, अबरार अहमद, सचिन मोटघरे, प्रणय मोटघरे, अजय गिदमारे, वामन शेंडे, मंगेश थोटे, मेगराज थोटे व फार मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *