भंडारा पत्रिका / प्रतिनिधी मोहाडी: तालुक्यातील ताडगाव येथील महिला ताना नारायण वनवे ४५ हि महिला बुधवार दि.१४ आगस्ट २०२४ ला ३.३० वाजता घरच्या दोन शेळ्या सिहरी कडिल जंगल जुडपीकडे चारायला गेली होती पण सायंकाळ झाली तरी ती घरी परतलीच नाही आजच्याने चार दिवस लोटुन गेले पण ति व दोन शेळ्या घरी परत आलेच नसल्याने घरच्या लोकांनी तिचा शोधा शोधा घेतला पण शोध लागला नाही याघटनेची तक्रार पोलीस स्टेशन आंधळगाव येथे दाखल करण्यात आली आहे.पोलिस व कांद्री येथील वन कर्मचारी त्या महिलेचा शोध घेत आहेत.ज्या कुणाला हि महिला आढळून आल्यास आंधळगाव पोलीस स्टेशनला किवा ताडगाव येथील त्यांच्या परीवासी संपर्क साधावा.