भंडारा पत्रिका / प्रतिनिधी नागपूर : उपराजधानीत पुन्हा एकदा महिला सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला. कामठीत तिसरीच्या विद्यार्थिनीवर एका ५० वर्षीय व्यक्तीने लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न केला तर अजनीत वैधमापन विभागातील उपनियंत्रक पदावर कार्यरत असलेल्या अधिकाºयाने एका महिलेशी अश्लील चाळे करीत विनयभंग केला. पहिल्या घटनेत, तिसºया वर्गात शिकणाºया मुलीला चॉकलेट देण्याचे आमिष दाखवून ५० वर्षीय व्यक्तीने लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न केला. ती रडायला लागल्यानंतर तिला चाकूचा धाक दाखवून गप्प केले. मुलीने पळतच घर गाठले आणि आईला घडलेला प्रसंग सांगितला. या प्रकरणी कामठी पोलिसांनी तक्रारीवरुन आरोपी आदेश वासनिक (५०) याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करुन अटक केली. राज्यातील महिलाच नव्हे तर चिमुकल्या मुलीही सुरक्षित नसल्याचे चित्र अवघ्या महाराष्ट्रात निर्माण झाले आहे.
राज्यातील कायदा व सुव्यवस्था बिघडली आहे. सध्या राज्यभर बदलापूर येथील एका शाळेतील विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणामुळे संपूर्ण महाराष्ट्र ढवळून निघाला आहे. राज्यभरात विविध संघटना आणि संस्था ठिकठिकाणी आंदोलने करीत आहेत. अशातच कामठी परीसरातील आठ वर्षाच्या मुलीला आदेश वासनिक या नराधमाने मंगळवारी रात्री आठ वाजता चॉकलेट घेऊन देण्याचे आमिष दाखवले. चॉकलेटच्या आमिषाने ती मुलगी त्याच्याजवळ गेली. त्याने घरात चॉकलेट असल्याचे सांगून आतमध्ये नेले. तेथे त्याने चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. अचानक झालेल्या या प्रकारामुळे ती मुलगी भेदरली. तिने रडण्यास सुरुवात केली. त्यामुळे आदेशने चाकूचा धाक दाखवला. ‘तू जर कुणालाही काही सांगितले तर जीवे मारणार’ अशी धमकी दिली. त्यामुळे तिने लगेच घराकडे पळ काढला. घडलेला प्रसंग तिने आईला सांगितला. आईच्या पायाखालची जमीनच सरकली. तिने शेजाºयांच्या कानावर हा प्रकार घातला. त्यानंतर चिमुकलीसह आई कामठी पोलीस ठाण्यात गेली. तक्रारीवरून ठाणेदार प्रशांत जुमडे यांनी लगेच गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली. न्यायालयाने आरोपीची रवानगी मध्यवर्ती कारागृहात केली.
दुसºया घटनेत, वैधमापन विभागातील उपनियंत्रक पदावर कार्यरत असलेल्या अधिकाºयाने एका महिलेशी अश्लील चाळे करीत विनयभंग केला. त्या अधिकाºयाच्या विरुद्ध अजनी पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. विजय झोटे (५७) असे आरोपी उपनियंत्रकाचे नाव आहे. तक्रारदार महिलेचे पती वजनमापे दुरुस्ती व मशिन्स उत्पादनाचे काम करतात. नवीन वजनमापे पडताळणीसाठी त्यांनी शासकीय शुल्क भरले होते. त्यांनी तसा आॅनलाईन अर्जदेखील केला होता. ७ आॅगस्ट रोजी विजय झोटेने महिलेच्या पतीचा फोनवर अपमान केला. त्यामुळे ते तणावात होते. ८ आॅगस्टला झोटे व दोन सहकारी महिलेच्या घरी पोहोचले. महिलेने झोटेने केलेल्या अपमानामुळे पती तणावात असल्याची बाब सांगितली.
यावरून झोटेने काम न करण्याची धमकी दिली. झोटेने महिलेच्या पतीचा हात धरत त्यांच्या कार्यशाळेतून बाहेर ओढत नेले. महिलेने त्याला विरोध केला असता त्या महिलेचा देखील हात पकडत ओढले आणि अश्लील चाळे केले. महिला ओरडल्यानंतरही झोटेने तिचा विनयभंग केला. या घटनेमुळे हादरलेल्या महिलेने अजनी पोलीस ठाण्यात त्याच दिवशी तक्रार केली होती. मात्र, तत्कालीन पोलीस अधिकाºयांनी चौकशी करून गुन्हा नोंदवितो, अशी भूमिका घेतली. शासकीय अधिकारी असल्यामुळे झोटेविरोधात गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ करण्यात आली. काही सामाजिक कार्यकर्त्यांनी महिलेची बाजू लावून धरली. त्यामुळे अजनी पोलिसांनी झोटेविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला.