भंडारा : आज दिनांक २३ आॅगस्ट २०२४ रोजी मध्यान्हानंतर नुरुल हसन, भा.पो.से. यांनी भंडा- रा जिल्हा पोलीस अधीक्षक पदाचा कार्यभार स्विकारला आहे. यापूर्वी पोलीस अधीक्षक नूरुल हसन हे दोन वर्ष वर्धा जिल्हा पोलीस अधिक्षक म्हणून कार्यरत होते. वर्धा जिल्हयात दारुबंदी बाबत कठोर भूमिका घेतली होती व गुन्हेगारांविरुध्द मोक्का, एमपीडीए अंतर्गत मोठ्या प्रमाणावर कार्यवाही केली. त्याच लौकिकाने भंडारा जिल्हयातही पोलीसींग करावयाची आहे असे निर्देश त्यांनी पोलीस अधीकारी यांना दिले. भंडारा जिल्ह्यातील सर्व प्रतिष्ठीत नागरीकांना विनंती करण्यात येत आहे की, पोलीस अधीक्षक भंडारा यांना भेटण्यास येतांना पुष्पगुच्छ घेऊन न येता स्पर्धा परिक्षेकरीता उपयोगी असलेले पुस्तके किंवा थोर विचारवंताचे पुस्तके घेवून यावे, असे आव्हान नव्याने रुजू झालेले पोलीस अधिक्षक नूरुल हसन, यांनी केलेले आहे.