अवकाळी पावसाचा ९ हजार ४२० शेतकºयांना बसला फटका

भंडारा पत्रिका/तालुका प्रतिनिधी मोहाडी : सातही जिल्ह्यात फेब्रुवारी, मार्च व एप्रिल महिन्यात झालेला अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे शेती पिकांचे प्रचंड नुकसान झाले. एकूण ४ हजार ५१.३० हेक्टर आर क्षेत्राची हानी झाली. या नुकसानीसाठी १० कोटी ३९ लाख २६ हजार २९८ रुपयांची अपेक्षित निधी मंजूर करण्यात आली आहे. भंडारा जिल्ह्यात एक फेब्रुवारी ते १९ फेब्रुवारी तसेच एप्रिल महिन्यात शेत पिकांची नैसर्गिक आपत्तीने खरीप पिकांची हानी झाली. भंडारा जिल्ह्यातील सातही तालुक्यात ४ हजार ५१.३० हेक्टर आर शेत पीक बाधित झाले होते. सर्वाधिक खरीप पिकाचे नुकसान तुमसर तालुक्यात १ हजार ५६८.६३ हेक्टर आर क्षेत्रात झाले. तर सर्वात कमी बाधित क्षेत्र ५१.८१ हेक्टर आर साकोली तालुक्याचे झाले होते.

मार्च महिन्यात केवळ साकोली तालुक्यात ३३ शेतकºयांच्या शेती पिकांचे ८.९३ एवढे क्षेत्र बाधित झाले होते. त्याच्यानुकसानीची भरपाई २ लाख ४९ हजार ६६० रुपये दिली जाणार आहे. सर्वाधिक शेत पिकांच्या नुकसानीचा निधी मोहाडी व तुमसर तालुक्यात दिला जाणार आहे. अवकाळी पाऊस गारपिट तसेच वादळामुळे ३३ टक्केच्या वर स्वान झालेल्या बाधित पिकांच्या क्षेत्राची एकूण माहिती जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद चे मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाºयांनी अंतरिम केली आहे. शासन स्तरावरून निधी आणण्यासाठी आमदार राजू कारेमोरे यांनी पाठपुरावा केला. त्यामुळे शासनाने खरीप पिकांचे नुकसान झालेल्या शेतकºयांना निधी मिळण्याच्या मार्ग मोकळा झाला आहे. लवकरच त्यांच्या बँक खात्यावर निधी पोहोचती केली जाणार आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *