भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : माज्या यशाच्या मागे मतदार बहिणींचा मोठा वाटा आहे आणि ज्याच्या पाठीशी बहिणींचा आशीर्वाद असतो तो कधीच असफल होऊ शकत नाही. या करीता आपल्या मतदार भगिनींना सक्षम बनविण्या करीता नेहमी प्रयत्नशील राहण्याचे वचन आज आम. नरेंद्र भोंडेकर यांनी दिले. राखी सणाचे अवचित्य साधत आज शिवसेनेच्या महिला आघाडी तर्फे येथील मंगलमूर्ती कार्यालयात रक्षाबंधन महिला मेळाव्याचे आयोजन केले गेले होते. या मेळाव्याला ते प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या वेळी मेळाव्यात आलेल्या महिलांनी त्यांना राखी बांधून आपल्या विधानसभे करीत सदैव झटत राहण्याचे वचन मागितले. मंचावरून संबोधित करताना आम. भोंडेकर पुढे म्हणाले की, महिलांच्या उत्थाना करीता संपूर्ण महाराष्ट्रात कुठे नाही ते भंडारा विधानसभेत महिला ग्राम संघांची स्थापना केली जात आहे, जी संपूर्ण महाराष्ट्रात एक उत्तम उदाहरण ठरणार असून आता राज्यात सर्वात मोठा ग्राम संघ आपल्या विधान सभेत बनविण्याची तयारी केली जात आहे. याच अंतर्गत ५० लाख रुपयांचा निधी देऊन महिला बचत भावनांची निर्मिती झाल्याने महिलांना सभेसाठी हक्काचे स्थान मिळवून दिले आहे.
विरोधी पक्षाला घेरत आम. भोंडेकर म्हणाले की, शासनाने महिलांच्या आर्थिक संबळीकरणा करीता माझी लाडकी बहीण योजना आणली परंतु निवडणुका तोंडावर असतांना काही लोकांकडून महिलेची सुरक्षेचा प्रश्न समोर ठेऊन विरोध केल्या जात आहे. परंतु महिला जर आर्थिक दृष्ट्या सक्षम होईल तर तिला कुणा पुढे हात पसरावे लागणार नाही आणि शिवाजी तेव्हाच घडले जेव्हा माँ जिजाऊ यांनी त्यांना लहानपण पासून संस्कार दिले. आजच्या महिलांनी सुद्धा आपल्या पाल्यांना असे संस्कार द्या की त्याने परकीय स्त्री ला माता बहीण या नजरेनेच बघावे. सोबतच विरोधकांच्या लाडका भाऊ योजनेच्या मागणीवरही आम. भोंडेकर यांनी उत्तर दिले की, ज्या महिलांना ३ हजार रुपये मिळाले त्यांना विचारले असता त्यांनी हेच उत्तर दिले की तो पैसा महिलांनी आपल्या परिवारावरच खर्च केला आहे.
आम. भोंडेकर महिला रुग्णालयाचे उल्लेख करीत म्हणाले की, २००९ साली जेव्हा आमदार झाले तेव्हा त्यांनी पहिल्यांदा महिला रुग्णालयाचा प्रश्न स्थपित केला आणि आंदोलन केले होते. त्या नंतर २०१४ ते १९ पर्यंत आमदारकीत नसतांना हा प्रश्न थंड्या बस्त्यात गेले, परंतु २०१९ मध्ये निवडून येताच त्यांनी पहिले महिला रुग्णालयाचे प्रश्न मार्गी लावले आणि शासन कडून पहिले ४३ कोटी, मग २५ कोटी आणि २८ कोटी रुपयांचा निधी खेचून आणला. ज्याचे फलित ही झाले आहे की महिला रुग्णालय पूर्णत्वास असून आता या करीत पदमान्यता मिळवून दिल्या गेली आहे आणि हा रुग्णालय लवकरच सुरू होणार असल्याची हमी आम. भोंडेकर यांनी दिली. सोबतच त्यांनी वचन दिले की भंडाºयाचा जो विकास होणार आहे तो भविष्यात भंडाºयाला देश पातळीवरच नव्हे तर संपूर्ण जगात ओळखले जाणार आहे. कार्यक्रमात डॉ. अश्विनिताई भोंडेकर, महिला आघाडी प्रमुख सविता तुरकर, माजी महिला आघाडी प्रमुख आशा गायधने, शालिनी नगदेवे, आशा गीरीपुंजे, सुद्धा बत्रा, प्रियंका साकुरे, वंदना दंडारे सह भंडारा क्षेत्रातील महिला बहुसंख्येने उपस्थित होत्या.