भंडारा पत्रिका/प्रतिनिधी तिरोडा : तालुक्यातील जमूनिया येथे दारूबंदी असतानाही एक व्यक्ती दारू विकत असल्याची माहिती गावातील महिलांना मिळाल्यावर त्यांनी तिरोडा पोलीस निरीक्षकांशी संपर्क साधून संबंधित दारू विक्रेत्यावर कारवाईची मागणी केल्यावरुन पोलिसांनी सदर दारु विक्रेयावर कार्यवाही केली. तिरोडा पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या जमूनिया या गावात मागील तेरा वर्षापासून दारूबंदी असतानाही गावातील एक ईसम शेत शिवारात अवैद्यरित्या दारू विकत असल्याची माहिती गावातील काही महिलांना मिळाल्यावरुन या महिलांनी तिरोडा पोलीस स्टेशन येथे येऊन पोलीस निरीक्षक अमित वानखेडे यांची भेटघेऊन सदर बाब त्यांचे लक्षात आणून देऊन संबंधित दारू विक्रेत्यावर कारवाईची मागणी केल्यावरून पोलीस निरीक्षकांनी बीट अंमलदार योगेश कुळमते यांना त्वरित संबंधितावर कारवाई करण्याची आदेश दिल्यावरुन योगेश कुळमते यांनी या महिलांसह जमूनिया येथे जाऊन जमूनिया शेत शिवारात अवैधरित्या मोह फुलाची दारू विक्री करणारे इसम प्रकाश धनलाल बिसेन ३५ वर्ष याचे कडून १० लिटर मोह फुलाची दारू किंमत एक हजार रुपये जप्त करून कार्यवाही केली.