नळाच्या पाण्यासाठी उचसरपंच घेणार जलसमाधी

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी तुमसर : तालुक्यातील परसवाडा या गावाला येत्या पंधरा दिवसात नळाला पाणी दिले नाहीतर, मी वैनगंगा नदीत उडी घेवून जलसमाधी घेईन, असा इशारा गावचे उपसरपंच पवन खवास यांनी दिला असून या आशयाचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले. परसवाडा देव्हाडी येथील मागील २० वर्षापासून महाराष्ट्र जल प्रादेशिक करण ही योजना कासवगतीने सुरू आहे. २०१८- २०१९ च्या दरम्यान तत्कालीन पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांना सुद्धा पत्रव्यवहार केले होते. त्यादरम्यान काही महिन्यांमध्ये महाराष्ट्र जल प्रादेशिक करण तालुक्यातील परसवाडा, देव्हाडी, हसारा, खापा, ढोरवाडा व स्टेशनटोली हे पाच गाव जलजीवन मिशनमध्ये हस्तांतरित केले असता घराघरापर्यंत नळ गेले पण, नळाला अजून एकही थेंब पाणी मिळाले नाही. प्रशासनाला खूप पत्रव्यवहार केले तरी काम मात्र कासवगतीने सुरू आहे.

यामुळे जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर भंडारा यांना निवेदन दिले. त्या निवेदनानुसार परसवाडा पंधरा दिवसात प्रशासनाने माज्या सर्वसामान्य जनतेला माज्या माय माऊलीला नळाला पाणी दिला नाही तर मी वैनगंगा नदी माडगी येथे जल समाधी घेणार आहे. जर माज्या तुमसर तालुक्यातील जनतेला माज्या मरणाने गावातील मायमाऊली जनतेला न्याय मिळत असेल तर माझ मरण कधीही परवडतो, संतवर्य ज्ञानदेवांनी वयाच्या अवघ्या २१ व्या वर्षी इंद्रायणी नदीच्या काठी संजीवन समाधी घेतली, जो जे वांछिल तो तो लाहो आणि जगाला पसायदान दिला, त्या भूमिकेत जर माज्या माय माऊलीला न्याय मिळत असेल आणि प्रशासनाची झोप उघडत असेल तर माझं मरण कधीही परवडतो. असे उपसरपंच पवन खवास यांनी निवेदनात म्हटले. यावेळी शिवसेना विभाग प्रमुख अमित एच मेश्राम, शाखा प्रमुख रोशन ढोके, सिहोरा ग्रामपंचायतचे उपसरपंच सलाम शेख, सुजित पेरे, देवेंद्र मेशराम, श्याम नागपूरे, मधुकर बुरडे, लक्ष्मण पवनकर व तुमसर तालुक्यातील उपसरपंच संघटना उपस्थित होते.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *