गोंदिया शहरात आणखी एक तरुणाची धारदार शस्त्राने हत्या

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी गोंदिया : गोंदिया शहरात गेल्या तीन चार महिन्यापासून विविध क्षुल्लक कारणावरून किंवा वैमनस्यातून होणारे हत्यांचे सत्र काही थांबता थांबत नसल्याचे घडत असल्याच्या घटनांनी दिसून येत आहे. असेच एक प्रकरण गुरुवारी रात्री छोटा गोंदिया येथील चिचबन मोहल्ला येथे क्षुल्लक कारणाने मनात राग धरून असलेल्या एक तरुण आणि दोन विधी संघर्ष बालकांनी एका तरुणाची धारदार शस्त्राने हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. सदर घटना २२ आॅगस्ट गुरुवारी रात्री साडेदहा ते अकरा वाजताच्या सुमारास घडली. विक्की फरकुंडे राहणार छोटा गोंदिया असे या घटनेतील मृतकाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार विकी फरकुंडे हा काही दिवसांपूर्वी गोंदिया शहरातील एन. डी. टेक्सटाईल या खाजगी दुकानात कामाला लागला होता आणि तो दररोज कामावरून रात्री साडेदहाच्या सुमारास घरी परत यायचा. ही बाब आरोपींनी हेरून त्यांनी गुरुवारी रात्री साडे दहाच्या सुमारास चीचबन मोहल्ला येथे विक्की फरकुंडे याला घेरलेआणि त्यावर धारदार शस्त्राने तीनही आरोपींनी वार केल्यामुळे त्याच्या जागीच मृत्यू झाला.

या घटनेची माहिती मिळतात घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी रोहिणी बनकर तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे दिनेश लब्डे आपल्या पथकासह पोहचले आणि मृतकाचे मृतदेह जिल्हा सामान्य शासकीय रुग्णालयात उत्तरीय तपासणी करिता पाठविण्यात आले. या संदर्भात मिळालेल्या अधिकच्या माहितीनुसार या घटनेतील तीनही आरोपी हे मृतक विक्की फरकुंडे याच्या घराशेजारी जुगार खेळायचे गांजा ओढायचे आणि जुगार खेळताना अश्लील शिवीगाळ करायचे याकरिता त्यांना मृतकाच्या आईने हटकले होते तरीपण आरोपींचे सदर कृत्य तसेच सुरू होते. याबाबतची माहिती मृतक विक्कीफरकुंडे याच्या आईने त्याला दिली असता मृतक विक्की फरकुंडे यांनी सदर मुलांना आधी समज दिली व यापुढे माज्या घरा शेजारी जुगार खेळायचा नाही, गांजा ओढायचा नाही अशी तंबी दिली होती. त्यावर ही मुले ऐकत नसल्यामुळे आरोपी मुलांपैकी दोघांना विक्की फरकुंडे यांनी काही दिवसापूर्वी दोन चार थापडा लगावल्या होत्या, त्या बाबीच्या राग मनात धरून सदर आरोपींनी गुरुवारी रात्री विक्की फरकुंडे याला दुकानातून परत येताना चिचबन मोहल्ला छोटा गोंदिया येथे घेरले आणि त्यावर धारदार शस्त्राने वार करून त्याची हत्या केली.

या हत्याची बातमी गोंदिया शहर पोलिसांना मिळतात पोलीस पथक आरोपींच्या शोधा करिता रात्रभर फिरून या घटनेतील सहभागी लक्की सुनिल मेश्राम वय १८ वर्ष आणि दोन विधी संघर्ष अश्या तिन्ही आरोपींना शुक्रवारी पहाटे ३ वाजता पर्यंत सदर तिन्ही आरोपींना अटक केली आहे. आरोपींना अटक करण्याची कामगिरी स्थानिक गुन्हे शाखेचे दिनेश लब्डे यांच्या नेतृत्वात हवालदार राजू मिश्रा, महेश मेहर, तुरकर, बिसेन, रंहागडाले, विठ्ठले आदींनी केली. सदर घटनेचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी रोहिणी बानकर यांच्या नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दिनेश लबडे करीत आहेत.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *