नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मानसिकता महिलाविरोधी आहे. त्यामुळे त्यांनी बदलापूर आणि पश्चिम बंगालच्या घटनेबाबत मौन बाळगले आहे, अशी टीका काँग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्त्या डॉ. रागिणी नायक यांनी केली. ठाणे जिल्ह्यातील बदलापूर येथे दोन चिमुकल्यांवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या पार्श्वभूमीवर डॉ. रागिणी नायक यांनी शुक्रवारी नागपूर पत्रकार क्लबमध्ये पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी विशाल मुत्तेमवार, अजित सिंह उपस्थित होते.
संघप्रमुखांना केवळ विजयादशमीला ‘नारी-शक्ती’ आठवते
