भंडारा पत्रिका/ यशवंत थोटे मोहाडी : भारतीय संस्कृतीमध्ये सणांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. सण हा आपल्या जीवनाचा एक अविभाज्य भागच आहे. अस म्हटले तर घावगं ठरणार नाही. मराठी माणसे तर मुळातच उत्सवप्रिय ज्या आतुरतेने आपण गणपती बाप्पा मोरयाची वाट पाहतो त्याच उत्साहाने मोहाडीवासी श्रीकृष्ण जन्माष्टमीला अर्थात कान्होबाला भरगच्च १ कोटी ८० लाखांची खरेदी केली जाते. कुठल्याही सणाचा आनंद लुटताना त्या दिवसाचा संबंध देवा-देवीकींशी लावतो. गेली कित्येक वर्ष मोहाडीवासी कान्होबावासी अर्थात श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी करतात. भंडारा-तुमसर राज्य मार्गावर असलेले मोहाडी हे गाव तालुक्याचे ठिकाण आहे. या ठिकाणी मोहाडी माँ चौण्डेश्वरी देवीचे जागृत देवस्थान आहे.
मोहाडीवासीयांचे आराध्य दैवत व श्रद्धास्थान असलेले जिमेदार बाबा मंदिर आहे. भंडारा जिल्हा मोठ्या प्रमाणात हलबा कोष्टी समाजातील बहुसंख्य नागरिक प्रतिक्षेतही जगण्याची अपेक्षा बाळगून आहे. भंडारामोहाडी-आंधळगाव-सिहोरा-मुंढरीसानगडी-पालांदूर-किटाळी-अड्याळ-पवनी यामध्ये हलबा कोष्टीची बºयापैकी लोकसंख्या आहे. विणकरी हा त्यांचा व्यवसा आहे. मांगठ्यावर लुगडे आणि धोतर तयार करण्यासाठी कांडे भरण्यापासून तर पांजन करणे-विणणे अशी किती श्रम पडतात. याचा विचार न केलेला बरा. परंतु, अनेक गावातील मांगठ्याची खटखट बंद पडली आहे. आठवड्यातून दोनदा लागणाºया त्यांच्या बाजारपेठा इतिहास जमा झाल्या असल्या तरीही विणकरी व्यवसायाची दैनावस्था पाहत आहे. विणकरांची दुर्दशा झाली असली तरी या समाजाने जोपासलेला श्रीकृष्ण जन्माष्टमी अर्थात कान्होबा सणाला आजही तोड नाही. मोहाडीचा’कान्होबा’ म्हणून येथे या सणाचे आगळेवेगळे वैशिष्ट्य आहे. मोहाडी नगरपंचायतची लोकसंख्या १० हजार ५८० आहे. या गावात ६० टक्केच्यावर हलबा बांधव समाजातील आहेत. आज अनेक विणकर कुटुंबातील मोठमोठ्या हुद्द्यावर भारताच्या कानाकोपºयात आजही कार्यरत आहेत.
गावात इतरही समाजाचे लोक श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी करतात. परंतु, विणकरांचा कान्होबा सण काही वेगळाच आहे. विणकर समाजातील कित्येकजण शेतीच्या कामावर जातात. विणकर समाजातील नोकरी व्यवसाय करणारे दिवाळीत येणार नाहीत. लग्नाला क्वचितच येतात. मात्र, श्रीकृष्ण जन्माष्टमी अर्थातकान्होबाला हमखास भारताच्या कानाकोपºयातून मोहाडीला येतात. यानिमित्ताने सर्वांच्या भेटी होतात. विणकर व इतर समाजातील भावीक श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी सकाळी ७ वाजताच्या सुमारास आंघोळ करून घराच्या बाहेर पडतात क्रिष्णा टेलिकॉम सेंटरजवळ कुंभाराची घरे आहेत. सध्या वेळेअभावी लोकसंख्या १० हजार ५८० च्या मानानेकान्होबा म्हणजे मातीचे मुर्ती असलेली श्रीकृष्णाची मुर्तीची तयारी सुरू असते. किमान २५१ रुपयापासून ३५०१ रुपयापर्यंत कान्होबा मातीच्या मुर्तीची किंमत असल्याचे मुतीर्कार निखील रामदास पाठक यांनी सांगितले. मोहाडी शहरातील गांधीवार्डात १ हजार ८९२ पैकी १८५,
सुभाषवार्डात १ हजार ९८५ पैकी २०२, टिळकवार्डात १ हजार ८२२ पैकी ४३२, राजेंद्रनगरात १ हजार ८९१ पैकी २२८, नेहरूवार्डात १ हजार ८१६ पैकी ३९६, इंदिरावार्डात १ हजार १७५ पैकी १६८ असून एकूण ६ प्रभागातील लोकसंख्या १० हजार ५२७ असून २ हजार ११७ पैकी १ हजार ६११ कुटुंबातील सदस्य प्रमुखाकडे मोहाडीचा कान्होबा मूर्तीची स्थापना करण्यात येत असल्याने किराणा दुकानदार स्वास्तिक निमजे, फागु कुंभारे, अजय कुंभारे, कमला निमजे, कल्पेश श्रीपाद, काशीराम नंदनवार, मोहन पराते, प्रभाकर उपरकर, चैतन्य कारंजेकर, जगदीश पाटील, नितीन थोटे, शशिकांत पाटील, अतुल झोडे, चंद्रशेखर साठवणे, लक्ष्मण बावणे, हेमंत मेहर, विनोद बडवाईक, पदमाकर गभने, वसंत कारंजेकर,
भाऊदास येळणे, श्रीकृष्ण झंझाड, अमित उपरकर, अशोक कारंजेकर, सुरेश वडतकर, विलास वाडीभस्मे, आशिष बडवाईक, अगस्ती बारई, मयुर गभने, नवनीत बशीने यांनी प्रत्येकी नारळ १ हजार ५०० नग, साखर २ हजार किलो, रवा २५० किलो, मैदा २०० किलो, पोहे २०० किलो, मुरमुरे ४० किलो, खाद्य तेल ३ हजार किलो, करंजीचा सुखामेवा २० किलो, खाखस ५ किलो एक दुकानदार विक्री करीत असतो. प्रत्येकी ३०० रुपये देऊन दहा दिवस स्पेशल मजूर ठेवून मदत घेतली जाते. मोहाडीच्या कान्होबा उत्सवानिमित्ताने एक ग्राहक १५०० ते २००० रुपयांची खरेदी करीत असतो. एका किराणा दुकानदार ३०० ग्राहकाकडून ६ लाख रुपयांचा व्यवसाय होतो. मोहाडी शहरातील ३० किराणा दुकानदार १ कोटी ८० लाखांची उलाढाल मोहाडीचा कान्होबा उत्सवात होत असल्याची माहिती किराणा व्यापारी संघाचे संस्थापक रंजन ढोमणे यांनी दैनिक भंडारा पत्रिकाला सांगितले.