भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : पोलीस मुख्यालय येथील बहुउद्देशीय हॉल येथे उमेद- महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत लखपती दीदी संमेलन आयोजित करण्यात आले होते सदर कार्यक्रमात माननीय पंतप्रधान महोदय यांच्या जळगाव येथील कार्यक्रमाचे दूर प्रक्षेपण करण्यात आले तसेच भंडारा तालुक्यातील ४४५ महिलांना लखपती दीदी प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. विशेष म्हणजे आज या कार्यक्रमाच्या निमित्त साधून विविध बँकांच्या माध्यमातून जिल्ह्यातील महिला ५१७ बचत गटांना १८ कोटी चे कर्ज वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले प्रसंगी जिल्हा परिषद भंडारा चे मुख्य कार्यकारी अधिकारी समीर कुर्तकोटी, पंचायत समिती भंडारा चे उपसभापती प्रशांत खोब्रागडे, विनोदजी बांते जिल्हा परिषद सदस्य यांनी प्रामुख्याने उपस्थित राहून मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक प्रकल्प संचालक विवेक बोंद्रे यांनी लखपती दीदी संकल्पने बद्दल मार्गदर्शन करून जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक गणेश तईकर व सर्व बँकर्सचे आभार व्यक्त केले.