भंडारा पत्रिका / प्रतिनिधी नागपूर : नागपूर वरून अमरावती आणि पुढे अकोल्याला जाणारी शिवशाही बस नांदगाव पेठ जवळ उलटल्याने झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू तर २५ प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. ही घटना रविवारी सकाळी साडेदहा वाजताच्या दरम्यान घडली.नागपूर बस स्थानकावरून एमएच ०९ ईएम १७७८ क्रमांकाचे शिवशाही बस सकाळी निघाली होती. अमरावतीच्या नांदगाव पेठ जवळ सदर बस पोहोचली असता महामार्गावर बसच्या समोर गाय आडवी आली. या गाईला वाचवण्याचा प्रयत्नात बस चालकाचे नियंत्रण सुटले आणि ही बस रस्त्याच्या कडेला जाऊन उलटली. ही घटना लक्षात येताच महामार्गावरून जाणाºया नागरिकांनी धाव घेत पोलिसांना माहिती दिली. बसमध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्याची प्रयत्न सुरू झाले. झालेल्या अपघातामध्ये दोन प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती असून २५ प्रवाशी जखमी झाले आहे. त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे.