भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : पावसाळ्यामुळे रस्त्यावर पाणी येऊ नये यासाठी तुंबलेल्या नाल्या मोकळ्या करण्यात आल्या आहेत. परंतु उघड्या करण्यात आलेल्या नाल्या अद्यापही झाकण्यात आल्या नाहीत. त्यामुळे या नाल्या धोकादायक ठरत आहेत. पावसामुळे भंडारा शहरातील खात रोडवरील नाल्यांचे पाणी प्रचंड प्रमाणात रस्त्यावर आले होते. त्यामुळे रस्त्याच्या एक भाग बंद झाला होता. अनेकांच्या घरात पाणी गेले होते. घरातील साहित्याचे प्रमाणात नुकसान झाले होते. त्यानंतर नगरपरिषदेने तुंबलेल्या नाल्यातील कचरा काढण्याच्या अभियान हाती घेतला. खात रोडवरील शक्ती नगर भागातील नाल्यांचे झाकणे काढण्यात आली. नाल्याचे साफसफाई करण्यात आली.
नाल्यांच्या बाजूने माती व कचºयांचे ढीग तयार झाले. नगर परिषदेकडून कचºयाचे ढिगाºयंची विल्हेवाट लावण्यात आले. मात्र अजूनही अनेक ठिकाणी मातीचे ढिगारे पडून आहेत. त्या पावसामुळे नाल्या जवळील माती पुन्हा नाल्यांमध्ये जात आहे. नाले सफाई करताना नाल्यातील वरची आच्छादन काढून टाकण्यात आली. नाल्यातून आता सांडपाण्याच्या प्रवाह व्यवस्थित होत आहे. तथापि , नालेसफाई करण्यासाठी सिमेंटची झाकणे काढून फोडून टाकण्यात आली. त्यामुळे शक्ती नगर मधील नाल्या आता उघड्या पडल्या आहेत. ह्या नाल्या अतिशय धोकादायक झालेल्या आहेत. त्या नाल्यांवर सिमेंटचे अच्छादन तातडीने तयार करण्यात यावे. उशीर होण्यापूर्वी मोठे धोके टाळण्यात यावे अशी मागणी खात रोडवरील शक्ती नगर मध्ये राहणाºया नागरिकांनी केली आहे.