भंडारा पत्रिका प्रतिनिधी खापा/ तुमसर : सदगुरु महान त्यागी बाबा जुमदेवजी यांनी सेवकांना दिलेल्या चार तत्व तीन शब्द आणि पाच नियम यांचे तंतोतंत पालन करून सेवकांनी आपल्या कुटुंबात व सेवकात सुख समाधान मिळवा व आपले जीवनमान उंचवा असे मनोगत खासदार प्रशांत पडोळे यांनी येथील परमपूज्य परमात्मा एक सांस्कृतिक भवन खापा येथे नुकत्याच झालेल्या सृष्टी हवन कार्याच्या निमित्ताने मार्गदर्शन केले. परमपूज्य परमात्मा एक सेवक बांधवांच्या वतीने बाबांच्या शिकवणीनुसार भगवत कार्याची चर्चा बैठक सांस्कृतिक भवन येथे देवाजी ठवकर मार्गदर्शक यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली . यावेळी बालकदास ठवकर रवी कडव यांनी सुद्धा सेवकांना मार्गदर्शन केले. प्रामुख्याने उपस्थित परमपूज्य परमात्मा एक चे सेवक रवी कडव, मार्गदर्शक व माजी संचालक बालकदास ठवकर, जिल्हा परिषद सभापती रमेश पारधी, माजी सरपंच विठ्ठलराव काहालकर शिवाभाऊ समरीत, प्रमोद तीतिरमारे, उपसरपंच हंसराज ठवकर, रोशन मने, युवराज भोयर, खुशाल भोयर, सुदाम वंजारी, गोपीचंद बोंद्रे, पोलीस पीएसआय प्रेमनाथ ठवकर, इत्यादी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते,
परम पूज्य परमात्मा एक सेवकांच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार, व सेवकांच्या मुलांना शासकीय नोकरीत प्राधान्य मिळाल्याबद्दल त्यांच्या सुद्धा सत्कार सांस्कृतिक भवन खापा येथे करण्यात आला, व सेवकांना विविध मार्गदर्शकांचे मार्गदर्शन सुद्धा करण्यात आले, सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक व संचालन प्राध्यापक विश्वनाथ ठवकर यांनी केल. उपस्थित भगवंताचे सेवकांचे आभार पत्रकार काका भाऊ भोयर यांनी मानले. कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी लखपती ठवकर, विलास तिजारे, अमान वैद्य, कैलास तिजारे, विलास कानोजे, अभिषेक ठवकर, सुनील ठवकर कवडू ठवकर, संदीप काळे, रमेश ईश्वरकर, सौ अनिता ठवकर, उषा ठवकर, कलापिकल मुंडे, मंजुषा भोयर, सुनिता बोराडे, कार्यक्रमास सेवक सेविका मोठ्या संख्येने उपस्थित होते,