पूर पीडित शेतकरी अद्यापही मदतीपासून वंचित

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी पवनी : तालुक्यात मागील वर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे व गोसे धरणातील अतिरिक्त सोडलेल्या पाण्यामुळे वैनगंगा नदी काठाजवळील शेतीचे नुकसान झाले. शासनाने मागील वर्षी पूर पीडित शेतकºयांची यादी बनवली. ती यादी यावर्षी प्रकाशित करण्यात आली. परंतु, यादीत अनेकांची नावे समाविष्ट नाहीत. कित्येकांची नावे सुटलेली आहेत. ज्या शेतकºयांचे अतोनात नुकसान झाले व पुराचे पाणी शेतामध्ये शिरले होते, अशा शेतकºयांना यादीतून वगळण्यात आले. अशाच प्रकार गावागावांमध्ये दिसून येत आहे. यामुळे शेतकºयांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. नदीकाठावरील गावामध्ये नुकसानीचे सर्वेक्षण बरोबर झालेले नसल्याचे समजून येते. एकदा यादी बनल्यानंतर त्या यादीतून नावे का गाळले जातात, असा प्रश्न आता विचारला जात आहे. संबंधित कर्मचाºयांनी मोक्यावर न जाता अंदाजाने व आपल्या मजीर्तील लोकांना या यादीमध्ये समाविष्ट केल्याचे दिसून येते. त्यामुळे त्या शेतकºयांची मागील वर्षाच्या पूरग्रस्तांच्या यादीत नावे नाहीत, त्यांचे पुन्हा सर्वेक्षण करण्यात यावे, शासनप्रशासनाने दखल घेऊन नावे सुटलेल्या शेतकºयांची त्वरित यादी बनवण्यात यावी आणि ती यादी शासनाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात यावी, अशी वंचित शेतकºयांकडुन होत आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *