भंडारा पत्रिका / प्रतिनिधी देवरी: देशभरात महिला आणि अल्पवयीन मुलींवर होणाºया लैंगिक अत्याचारांबाबत सर्वत्र संताप व्यक्त केला जात असतानाच येथे १३ वर्षीय शाळकरी मुलीचा दोनदा विनयभंग करण्यात आल्याची घटना शुक्रवारी (दि. २३) उघडकीस आली. त्या मुलीच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, आरोपी खुशाल कैलास राऊत (१८, रा. परसटोला) या तरुणाला अटक केली आहे. मात्र, या घटनेमुळे अल्पवयीन शाळकरी मुली शहरात सुरक्षित नसल्याची भीती पीडित मुलीच्या पालकांसह समाजमनात निर्माण झाली आहे. देवरी पोलिस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या शिवाजी चौकात गुरुवारी (दि. २२) सकाळी १०:३० वाजता पीडित मुलगी आपल्या खासगी वसतिगृहातून शाळेत जात होती.
दरम्यान, शिवाजी चौकातील स्टार कॉम्प्यटरजवळ आरोपी खशाल राऊत स्कूटीवर आला व त्याने मुलीचा हात पकडून मोबाइल घेण्यास सांगितले. मुलीने नकार दिला असता, त्याने तिला मारण्याची धमकी दिली. त्यानंतर दुसºया दिवशी शुक्रवारी (दि. २३) सकाळी १०:३० वाजता त्याने पीडित मुलीचा पाठलाग करीत शाळेसमोर तिचा हात पकडला व माझ्याशी बोल, नाही तर तुला मारेन, अशी धमकी देत तिला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करीत तिचा विनयभंग केला. यावर मुलगी जोरात ओरड लागल्याने आरोपीने तेथन पळ काढला. मुलीने घडलेली घटना वसतिगृह अधीक्षिकेला सांगून पोलिस ठाणे गाठले. तिच्या तक्रारीवरून पोलिसांनी शुक्रवारी भारतीय न्याय संहिता कलम ७४,७८, ३५, १(२), सहकलम ८,१२ लैंगिक अपराध बाल संरक्षण अधिनियम २०१२ अंतर्गत गुन्हा दाखल करून आरोपी खुशाल राऊत याला अटक केली.
देवरी पोलिसांनी त्यालान्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याला तुरुंगवासात पाठविले आहे. पुढील तपास सपोनि गंगाकचर करीत आहेत. देवरी हे तालुक्याचे ठिकाण असल्याने ग्रामीण भागातून शिक्षणासाठी येणाºया शाळकरी मुलींची संख्या जास्त प्रमाणात आहे. बसस्थानक ते शाळा व शाळा ते बसस्थानक यादरम्यान पायी जाताना शहरातील रोडरोमिओ मुलींना त्रास देताना आढळून येतात. परंतु या रोडरोमिओंवर कारवाई होत नाही. यातच पोलिस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या ठिकाणी भरदिवसा शाळकरी मुलीवर विनयभंग झाल्याची घटना घडल्याने पालकांनी संताप व्यक्त करीत पोलिसांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.