सिंधुदुर्ग : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांना देशातील पहिल्या आरमाराचे जनक म्हणून ओळखले जातात. गेल्या वर्षी ४ डिसेंबर रोजी नौदल दिनानिमित्त मालवणच्या राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा दुदैर्वाने कोसळला. यामागचे कारण अद्याप कळू शकलेलं नाही. शिवाजी महाराजांचा पुतळा निकृष्ट कामामुळे कोसळल्याचा आरोप करण्यात येत आहे. एक वर्षही पूर्ण होण्यापूर्वीच कोट्यवधी रुपये खर्च करून उभारलेला हा पुतळा कोसळल्याने नागरिकांमध्ये विशेषत: शिवभक्तांमध्ये संतापाची लाट आली आहे.
छत्रपतींचा पुतळा कोसळला !
