भंडारा पत्रिका/प्रतिनिधी गोंदिया : ‘हाती घोडा पालखी जय कन्हैया लाल की’ या जल्लोषात गोंदिया जिल्ह्यात दिड दिवसाच्या श्रीकृष्णाला निरोप देण्यात आले. यावेळी जिल्हयातील भक्तांनी दिड दिवसाचा श्रीकृष्ण उत्सव मोठ्या उत्सवात साजरा केला. तर रात्री उशिरा पर्यंत ‘हाती घोडा पालखी जय कन्हैया लाल की’ या जल्लोषात श्री कृष्णाला निरोप देण्यात आला. तर जिल्ह्यातील अनेक नदी, नाले, तलाव या ठिकाणी श्री कृष्णाला निरोप विसर्जन करण्यात आले. यावेळी अनेकांनी श्रीकृष्णाच्या विसर्जन वेळी आरती करत डिजे च्या तालावर नाचत गात श्रीकृष्णाला रात्री उशिरा पर्यंत निरोप दिले. हिंदू धर्मात श्रीकृष्ण जन्माष्टमी किंवा गोकूळाष्टमी हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. जन्माष्टमी निमित्त भगवान श्रीकृष्णाची मुर्ती स्थापना केली जाते. पाळणा बांधला जातो. श्रीकृष्णाच्या मुतीर्सोबत गवळणीची मुर्ती ठेवली जाते. दीड दिवस पुजा अर्चना करून मुर्तीचे विसर्जन केले. जाते. २६ आॅगस्ट ला जिल्ह्यात उत्साहात तसेच भक्ती भावात श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी करण्यात आली. तर दि. २७ आॅगस्ट ला घरोघरी विराजमान दिड दिवसाच्या पाहुण्याला निरोप देण्यात आला.
विशेषत: श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उत्साह बच्चे कंपनीमध्ये पहावयास मिळाला. जिल्ह्यात श्रीकृष्ण जन्माष्टमी मोठ्या भक्तीभावात साजरी केली जात आहे. दरम्यान घरोघरी श्रीकृष्ण मुर्तीची स्थापना करण्यात आली. जिल्ह्यात घरोघरी विराजमान असलेल्या भगवान श्रीकृष्ण मुर्तीची पुजा अर्चना करण्यात आली. दिड दिवसाचा पाहुणा घरी आल्याने बच्चे कंपनीसह घरातील सर्व मंडळी आनंदित होती. रात्रभर भजन, पुजनानंतर उपवास, रात्रजागरण आदि कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.त्यामुळे कालपासून गोंदिया जिल्हाभक्तीभावात रमल्याचे दिसून आले. दुपारनंतर दीड दिवसाच्या पाहुण्याला निरोप देण्यासाठी भाविकांमध्ये लगबग दिसून आली. दरम्यान ढोल, ताशा, भजन-दिंडीच्या निनादात पाहुण्याला रात्री उशिरा पर्यंत निरोप देण्यात आले.