भंडारा पत्रिका/प्रतिनिधी तुमसर : शहरातील मुख्यमार्गापासून तर गल्लीपर्यंत मोठे मोठे खड्डे पडलेले आहेत. काही ठिकाणी अपघात होऊन सुद्धा शासन याकडे दुर्लक्ष करत असून शासनाच्या विरोधात आज सराफ लाईन येते राष्ट्रवादी (अजित पवार गट) कार्यकर्त्यांनी खड्डयामध्ये केक कापून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विरोधात नारेबाजी करत एक आगळावेगळा आंदोलन करण्यात आले. आज सर्वत्र शहरांमध्ये खड्डेच खड्डे दिसत आहे. तुमसर ते भंडारा मार्ग असो या तुमसर ते बालाघाट जाणारा आंतरराज्य मार्ग असो परंतु शासन याकडे दुर्लक्ष करत असून हे खड्डे आता जड वाहनाने मोठे होत असून त्यात अपघाताचे संकेत वाढ होत आहेत.
एवढेच नव्हे तर शहरातील सराफा लाईन येथे चक्क रस्ता गायब झालेले असून तिथे फक्त मोठे मोठे खड्डे दिसत आहे. आज राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी पवित्रा घेऊन शासनाच्या विरोधात खड्डयांमध्ये चक्क केक कापून व नारेबाजी करत आंदोलन केले. मुख्यमंत्र्यांनी काल आपल्या भाषणामध्ये बोलले की, रस्त्यावर खड्डे पडल्यास अधिकाºयावर कारवाई करण्यात येईल परंतु यात कुठल्या अधिकाºयावर कारवाई झाली नसून उलट दुर्लक्ष करीत असल्याच्या चित्र तुमसर शहरात दिसत आहेत. यावेळी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे माजी नगराध्यक्ष अभिषेक कारेमोरे, संताजी युवा ब्रिगेडचे अध्यक्ष विक्रम लांजेवार, सुनील थोटे, निशिकांत पेठे, सज्जू शेख, मनीष डाहारे, गोवर्धन किरपाणे, गौरव सोनी, बाळा कारेमोरे, प्रतीक निखाडे व राष्ट्रवादी कार्यकर्ता आणि सराफा असोसिएशनचे दुकान मालक उपस्थित होते.