मूलबाळ प्राप्तीचा दावा करणाºया ज्योतिषांना दोन वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : ज्यांना मूलबाळ होत नाही त्यांना मूल प्राप्ती करून देण्याचा दावा करणारे पत्रक वाटून नागरिकांची दिशाभुल करणाºया दोन ज्योतिषांना लाखनी येथील न्याय दंडाधिकारी प्रथम वर्ग यांनी दोन वर्षाच्या सश्रम करावासाची व दहा हजाराची शिक्षा सुनावली. प्रकरण असे की लाखनी येथील अलंकार लॉज येथे रामदास तुळशीराम वाईकर व रमेश दादाराम वाईकर रा. कारली जि. यवतमाळ यांनी खोली भाड्याने घेतली. या दोन्ही ज्योतिषांनी स्वत:च्या नावाने पत्रके छापून ते वर्तमानपत्राच्या माध्यमातून लाखनी शहरात वाटले. या पत्रकात त्यांनी ज्यांना मूलबाळ होत नाही त्यांना संतान प्राप्त करून देणे, पती-पत्नीचे वाद मिटवून देणे, वास्तुदोष दूर करणे, प्रेमिकांमध्ये जर अडचणी येत असतील तर त्या दूर करून देणे इत्यादी बाबी नमूद केल्या होत्या. कोणाला काही अडचण असल्यास त्यांनी अलंकार लॉज मधील रूम नंबर १५ मध्ये येऊन संपर्क साधण्याच्या आवाहन केले होते. सदर पत्रक लाखनी येथील महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पदाधिकारी सौ. अश्विनी दिलीप भिवगडे यांना मिळाले. त्यांनी याबाबतची माहिती महाराष्ट्र अंधश्रद्धा समितीचे जिल्हा प्रधान सचिव विष्णुदास लोणारे यांना दिली.

यानंतर सौ.अश्विनी भिवगडे, विष्णुदास लोणारे, प्रशांत रामटेके हे अलंकार लॉज येथील या ज्योतिषांना भेटायला गेले. तेव्हा ज्योतिष रामदास वाईकर व रमेश वायकर यांना सौ.भिवगडे यांनी त्यांच्या लग्नाला सोळा वर्षे झाली असून मूलबाळ होत नाही असे सांगितले. तेव्हा या ज्योतिषांनी येत्या पंधरा महिन्यात तुम्हाला मूलबाळ होईल त्याकरता तुम्हाला पूजा करावी लागेल. पूजेसाठी लाल कपडा, उडीद, तुळशीची पाने, जन्मपत्रिका, आठशे रुपये व इतर साहित्य लागेल असे सांगितले. त्यावेळी पन्नास रुपये नगदी घेऊन सर्व साहित्य दुसºया दिवशी घेऊन येण्यास सांगितले. दुसºया दिवशी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्यावतीने लाखनी पोलीस स्टेशनला तक्रार नोंदविण्यात आली. पोलिसांनी धाड घालून लॉजमधून पूजेचे साहित्य, कलश, नारळ, फोटो, पंचांग इत्यादी साहित्य जप्त केले.

महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अनिष्ठ, अघोरी प्रथा व जादूटोणा यांना प्रतिबंध व त्याचे समूळ उच्चाटन करण्याबाबत अधिनियम २०१३ चे कलम ३ (२) सह कलम ३४ भा.दं.वि. प्रमाणे गुन्हा दाखल करून ज्योतिष्य रामदास तुळशीराम वाईकर वय ३९ वर्षे, रमेश दादाराव वाईकर वय ३४ वर्ष रा. कारली जि. यवतमाळ यांना अटक केली. सदर प्रकरण लाखनी येथील न्यायालयात चालले. या प्रकरणात पाच जणांच्या साक्षी नोंदविण्यात आल्या. महाराष्ट्र शासनातर्फे विशेष सहाय्यक अभियोक्ता कु. पी.आर. लिंगायत यांनी बाजू मांडली. साक्ष पुरावा व युक्तिवाद ऐकल्यानंतर लाखनी येथील न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग (न्यायालय क्रमांक २) एफ.के.सिद्दिकी यांनी आदेश दिला की आरोपी रामदास तुळशीराम वाईकर व आरोपी रमेश दादाराव वाईकर यांना महाराष्ट्र नरबळी आणि इतर माणूस अनिष्ठ प्रथा व जादूटोणा प्रतिबंध व त्याचे उच्चाटन करण्याबाबत अधिनिय्

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *