भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : दीड दिवसाचा पाहुणा म्हणून आलेल्या कान्होब्याची (श्रीकृष्ण) मनोभावे पूजाअर्चना करून कान्होब्याच्या निरोपासाठी चांदणी चौक येथील सागर तलावावर भाविकांनी गर्दी केली होती. मात्र या गर्दीतही चांदणी चौक परिसरातील युवा शक्ती संघटनेच्या कार्यकत्यांनी उत्कृष्ठ उपाययोजना करुन शांततेत कान्होब्याचे विसर्जन पार पाडले. या मध्ये जॅकी रावलानी, रूपेश टांगले, भगवान बावनकर, पुजा बालू ठवकर, अनुप ढोके, नितीन तुमाने, नरेंद्र पहाडे या सामाजिक कार्यकत्यांनी मोलाचे सहकार्य केले. तसेच शहरातील मिस्किन टँक, खांबतलाव, वैनगंगा नदीत सुद्धा कान्होबा विसर्जन भाविकांनी स्वयंस्फूर्तीने केल्याचे दिसून आले. भंडारा शहरातील चांदणी चौक परीसरातील सागर तलावात कान्होबा (श्रीकृष्ण) मूर्ती विसर्जनाकरिता आलेले भाविक भाविकांची गर्दी पहावयास मिळाली. चांदणी चौक परिसरातील होतकरु तरूणांनी चांदणी चौक परिसरातील या सागर तलावावर भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून चोख व्यवस्था केली होती.
युवा शक्ती संघटनेच्या वतीने कान्होबा विसर्जना करीता येणाºया भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून संपूर्ण परिसर स्वच्छ करून येण्याच्या मार्गावर मधात बॅरीगेट लावण्यात आले, तलावात बलून सोडण्यात आले, श्री कृष्णाच्या प्रतिमेसह पाण्याचा फवारा भाविकांनसाठी आकर्षित ठरला, भक्तीमय संगीत लावण्यात आले, कृष्ण भक्तांना प्रसाद वाटप करण्यात आली. कान्होब्याच्या या विसर्जनाच्या कार्यक्रमासाठीदरवर्षी चांदणी चौक परिसरातील तरूणवर्ग परिश्रम घेत असतात. यंदाही दोन दिवसांपासून जागरण करून युवकांनी तलाव व संपूर्ण परिसर स्वच्छ केला. चौकाचे सौंदर्यीकरण विद्युत रोषणाई, श्रीकृष्ण व राधेच्या वेशभूषेतील लहान बालके सुद्धा सर्वांचे लक्ष वेधून घेणारी ठरली. तलावात फुग्याच्या तोरणा बांधून विसर्जनाची जागा निर्धारित करण्यात आली होती. त्यामुळे येथे आलेल्या भाविकांकडून चांदणी चौक परिसरातील युवा शक्ती संघटनेच्या कार्यकत्यांचे कौतुक होत आहे.
कान्होबा विसर्जनाचे कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडण्याकरिता तसेच संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन युवा शक्ती संघटनेच्या माध्यमातून करण्यात आले त्यावेळी संघटनेचे संस्थापक/अध्यक्ष गोवर्धन निनावे, राकेश खेडकर, निरंजन निनावे, कुणाल बोकडे, सुर्यांश भंडारी, प्रकाश कांबळे, कृपाल तांडेकर, गौरव पारवे, शुभम सोनवाने, रवी खेडकर, लोकेश मदनकर, सागर असाटी, प्रद्युम्न निनावे, विक्की सोनवाने, आदित्य चौधरी, गौरव चोपकर, भूषण देशमुख, योगेश कोहाड, बबलू खंडाईत, सौरभ तांडेकर, बंटी गिरेपुंजे, यश चिंचुलकर, यश अंबाळकर, आकाश मडामे, पियुष मडामे व चांदणी चौक परिसरातील तरूणांनी परिश्रम घेतले.