भंडारा पत्रिका / प्रतिनिधी पवनी : पवनी नगर परिषद क्षेत्र- ांतर्गत शहरातील नागरीकांकरीता ४ डिपीआर नुसार ११८७ घरकुल मंजुर झाले होते त्यापैकी८८९ घरकुलाचे बांधकाम पुर्ण झाले असुन १०३० घरकुलाचे बांधकाम युध्दपातळीवर सुरू आहे.तर वारंवार सुचना/नोटीस देवुनही घरकुलाचे बांधकाम सुरू न केल्याने व घरकुल बांधकामासाठी सहमती न दिल्याने १५७ लाभार्थ्याचे घरकुल रद्द करण्यात आल्याची माहिती पवनी नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांनी दिली आहे. नगर परिषद पवनी क्षेत्रामध्ये प्रधानमंत्री आवास योजनेची अंमलबजावणी सुरु असुन नगर परिषद पवनी अंतर्गत सपुर्ण शहर करीता एकूण ४ डीपीआर नुसार एकूण ११८७ घरकुल मंजुर झाल होत.े त्यापैकी बºयाच लोकांनी वारंवार सुचना/नोटीस देऊनही घरकुलाचे बांधकाम सुरु न केल्यामुळे व घरकुल बांधकामासाठी सहमती न दिल्यामुळे एकुण १५७ घरकुल रद्द करण्यात आले.तर उर्वरित १०३० घरकुला पैकी ८८९ घरकुलाचे बांधकाम पुर्ण झालेले असुन १४१ घरकुलाचे बांधकाम प्रगती पथावर आहेत. बांधकाम पुर्ण झालेल्या ८८९ घरकुला पैकी डिपीआर १ चे शेवटचा हप्ता रुपये ३० हजार रूपये प्रमाणे २३१ लाभार्थ्यांच्या निधी मंजुर झाला होता.
सदर चा हप्ता लाभार्थ्यांना वितरीत सुद्धा करण्यात आलेला आहे. उर्वरित घरकुल धारकांचे Geo-tagging चे काम सुरु असतांना मधल्या कालावधीत Geo-tagginfg App मध्ये तांत्रिक अडचणीमुळे वरच्या स्तरावरून बंद होते त्यामुळे घरकुलांच Geo-tagging करता आले नाही सध्या मागील काही दिवसा पासुन Geo-tagging Appसुरु झाल्याने जलद गतीने Geo-tagging चे काम करण्यात येत असुन ते शासनाच्या पोर्टलवर उपलोड करून मान्यता देण्याची कार्यवाही सुरु असुन घरकुल लाभार्थ्यांच्या देयकासाठी शासन स्तरावर पाठपुरावा सुरु आहे.
शासनाकडून निधी उपलब्ध होताच लाभार्थ्यांच्या खात्या मध्ये निधी जमा करण्याची शासन स्तरावरून कार्यवाही करण्यात येणार आहे. प्रधानमंत्री आवास योजना ही सन मार्च-२०२४ पर्यंत मुदत वाढ होती. सदरच्या कालावधीत जानेवारी-२०२४ मध्ये बºयाच नविन लाभार्थ्यांनी नगर परिषदेकडे घरकुलासाठी अर्ज सादर केले होते. सदर अर्जाची तपासणी केली आहे. सदरच्या शासनाकडुन पुढच्या टप्प्या बाबत निर्देश प्राप्त होताच पुढचा टप्पात सदर लाभार्थ्यांचा समावेश करता येईल. तसेच सध्या सुरु असलेल्या Geo-tagging ची कामे जलद गतीने व सुलभ रित्या होण्याच्या दृष्टीने तसेच लाभार्थ्यांना घरकुलाचे हप्ते लवकरात लवकर प्राप्त होण्याच्या दृष्टीने लाभार्थ्यांना नगर परिषदेला सहकार्य करावे असे आवाहन मुख्याधिकारी नगर परिषद पवनी यांनी केले आहे.