भंडारा पत्रिका / प्रतिनिधी साकोली : पिटेझरी हे गाव साकोली तालुक्यातील अगदी जंगल व्याप्त परिसरातील शेवटच्या टोकाचे गाव. नागझिरा येथे जाण्याचे मुख्य प्रवेशद्वार. पिटेझरी हे आदिवासी बहुल छोटंसं गाव निसर्गाच्या साधनसंपत्तीने नटलेले सजलेले असे निसगार्चे अभिनव रूप. या छोट्याशा गावात मूळचे पुणे येथील राहणारे निसर्गप्रेमी, समाजसेवक किरण वसंत पुरंदरे आणि त्यांच्या अर्धांगिनी समाजसेविका सौ. अनघा किरण पुरंदरे यांनी साकोली तालुक्यातील निसर्गरम्य स्थळ वास्तव्याकरिता शोधले. ते गेल्या ५ वर्षांपासून येथे कायमचे वास्तव्यास आले आहेत. ग्राम विकासाची ज्वलंत तळमळ असणारे हसतमुख व्यक्तिमत्त्व असणाºया समाजसेवकाने पिटेझरीवासियांना काही वर्षातच मंत्रमुग्ध करून सर्वांचे मन जिंकले. गावात डॉ. बांगारी माथाई रोपवाटिका निर्माण करून जिल्ह्यात आणि जिल्ह्याबाहेर निसर्गाची किमया फुलवून निसर्गाचे धडे देणारे व्यक्तिमत्व असणारे किरण वसंत पुरंदरे व त्यांच्या अर्धांगिनी सौ. अनघा किरण पुरंदरे यांनी या रोपवाटिकेत ७५ वनस्पतींच्या प्रजातींची रोपे तयार केली आहेत.
ही रोपे जनसामान्यांना मोफत दिली जातात. या नर्सरीमध्ये विविध फळझाडे आंबा, फणस, चिकू, करवंद, आमरस, मोसंबी, केळ तसेच मसाल्याच्या प्रजाती – तेजपान,कलमी, आॅल स्पाईसेस तसेच औषधी गुणयुक्त झाडे गवती चहा, तसेच दुर्मिळ प्रजातींची शमीपत्र, रुद्राक्ष, अॅव्होकॅडो, वेलीवर्गीय वनस्पतींमध्ये कृष्णकमळ, जाई, जुई, बंगला पान इत्यादींची रोपे तयार केली जातात. सखी महिला बचत गटाअंतर्गत विविध वस्तूंची निर्मिती करून यात पर्यावरणपूरक कापडी पिशव्या तयार केल्या. प्लास्टिकला पयार्यी पिशव्या तयार करून कचरा मुक्तीचा संदेश समाजाला दिला. यात ५५ ते ६० महिलांना रोजगार मिळाला, तर बचत गटामार्फत रोजगार निर्मिती करून या स्थानिक आदिवासी महिलांना हळद, तिखट असे दैनंदिन उपयोगाच्या वस्तू तयार करून रोजगार निर्मिती केली. अनेक महिलांना स्वावलंबी करून त्यांच्या मनात आत्मविश्वास तयार करून रोजगाराला चालना दिली.
जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा पिटेझरी येथील सर्व मुलांसाठी स्वच्छतागृहाची सोय करण्यात आली आहे. या कामात निसर्गवेध न्यासाने पुढाकार घेतला. सन २०१५ पासून गावातील इयत्ता ७वी मध्ये शिकणाºया मुलामुलींना मोफत सायकल वाटप करण्यात येते. असे विविध सामाजिक उपक्रम अखंड सुरू आहेत. या सामाजिक कायार्ने पिटेझरी परिसरातील जनता सुखावली असून किरण वसंत पुरंदरे व्यक्तिमत्व म्हणजे आम्हासाठी देवदूत आहेत असे ग्रामस्थांचे मत आहे. हे सामाजिक कार्य अविरत सुरू ठेवण्याचा आमचा मानस आहे असे श्री. पुरंदरे पतिपत्नी विनम्रपणे नमूद करतात. निसगार्चं प्रेम हीच आमची खरी प्रेरणा आहे असे मत श्री. आणि सौ. पुरंदरे व्यक्त करतात.
“ग्रामीण भागातील महिलांना रोजगार प्राप्त व्हावा या समाजसेवेच्या उद्देशाने पिटेद्वारी येथील गरजू महिलांना रोजगार मिळावा म्हणून गावातील महिलांना एकत्र करून उद्योग मंदिराची निर्मिती केली. या उद्योग मंदिरात ७२ प्रकारच्या वस्तू तयार केल्या जातात. उदा. कापडी पिशव्या, टेबल क्लॉथ, गोधड्या, दुलया इत्यादी. पाखरशाळेची निर्मिती केली. सामाजिक कायार्ची आवड आणि ध्यास असलेल्या सौ. पुरंदरे पिटेझरीवासियांकरिता प्रेरणादायी ठरल्या असून त्या असे म्हणतात की, मला यातून भरपूर आनंद मिळतो आणि महिलांचे हसरे चेहरे बघून भरून येते. वन्य प्राण्यांकरिता जलकुंड तयार करून प्राण्यांची तहान भागविणारे दायित्व स्वीकारले. जंगलातील वन्यप्राणी उन्हाळ्यामध्ये पाणी पिण्याच्या हेतूने गावाशेजारी यायचे. त्यांना पाण्याची गरज असल्याचे लक्षात घेऊन जलकुंड निर्माण करून वन्य प्राण्यांना जीवनदान देणारे ते समाजासाठी आदर्श ठरले.”
अनघा किरण पुरंदरे समाजसेविका