भंडारा ते बपेरा महामार्गासाठी माजी खासदार शिशुपाल पटले यांनी केली अधिकाºयांची कानऊपाळणी

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी तुमसर : भंडारा ते बपेरा पर्यंतचा राष्ट्रीय महामार्ग तथा तुमसर शहरातील सराफा लाईन मार्गांवरती अत्यंत जीवघेणे खड्डे झालेले आहेत. दोनचाकी व चारचाकी वाहनाने प्रवास करीत असतांनी रस्त्यावरील खड्डयामुळे अनेक प्रवास्यांचे अपघात होत आहेत अपघातामध्ये काहींना आपले जीव गमवावे लागले तर अनेकांना अपंगत्व आलेले असल्यामु ळे सर्वसामान्य जनतेमध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाप्रती मोठ्या प्रमाणात असंतोष निर्माण झालेले आहे. सदर रस्ता नव्याने निर्माण करण्यात यावा याकरिता संबंधित विभागाला वारंवार जनप्रतिनिधी मार्फत निवेदन दिले असता दिलेल्या पत्राची साधी दखल संबंधित विभागामार्फत घेण्यात येत नाही. सा.बा.विभाग व राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या निष्काळजीमुळे निष्पाप लोकांचा बळी जात आहे करिता सामान्य जनतेचा जीव वाचवण्यासाठी राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने दखल घेतलेली असून सदर रस्ता त्वरित नव्याने निर्माण करण्यासाठी आज राष्ट्रीय महामार्ग विभागाचे उपविभागीय अभियंता श्री.मानवटकर व सा.बा.विभागाचे उपविभागीय अभियंता श्री.महाजन यांना माजी खासदार शिशुपाल पटले यांनी मौक्यावर पाचारण केले व रस्त्याच्या दुरवस्तेसाठी त्यांची चांगलीच कानऊपळणी केली.

येत्या ७ दिवसात रस्ते दुरुस्त करण्याचे काम सुरू करावे अन्यथा काँग्रेस तर्फे आपल्या विभागाच्या विरोधात मोठा आंदोलन करण्यात येईल.आंदोलन दरम्यान काही अनुचित प्रकार घडल्यास त्याची सर्वस्व जबाबदारी आपल्या विभागाची राहील.अशी ताकीद देण्यात आली. व तसे पत्र सुद्धा देण्यात आले.यावेळी माजी आमदार अनिल बावनकर,जि.प. सभापती रमेश पारधी,माजी नगराध्यक्ष अमर रगडे, माजी नगरसेवक बाळा ठाकूर,राजेश पारधी. प्रमोद कटरे, कान्हा बावनकर, देवचंद टेंभरे, शंकर राऊत, नरेश कुंभलकर,जय डोंगरे,रोहित बोंबार्डे, मुकेश सोनी,विजय पाटील, हसन मंसुरी, गजानन लांजेवार,रवींद्र चौरे, शिव बोरकर,किशोर भवसागर,नीरज गौर, सद्दामभाई,भीमराव शेंडे,दिलीप गौतम, डॉ.रुद्रसेन भजनकर उपस्थित होते.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *