भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : भंडारा शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे मालवण मधील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेल्या युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा दुर्घटना ग्रस्त झाल्याचा घटनेचा निषेध करण्याकरीता शुक्रवारी वार्ड भंडारा येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर मुक आंदोलन करण्यात आले. मालवण मधील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेल्या युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा दुर्घटना ग्रस्त झाला हे अत्यंत वेदनादायी आणि मनाला संताप आणणारे आहे. केवळ आठ महिन्यात हा पुतळा पडतो हे अनाकलनीय आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची उभारणी करतांना अक्षम्य त्रुटी झाल्याचे नाकारता येत नाही. या प्रकरणात जे कोणी दोषी असतील त्यांच्या विरुध्द कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी भंडारा शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. सरकारने अहोरात्र काम करुन राजकोट किल्ल्यावर युगपुरुष व भारतीय नौदलाचे जनक छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिभा आणि दैदिप्यमान शौयार्चा इतिहास सांगणारे स्मारक आणि शक्तिशाली पुतळा पुन्हा उभारावा अशी आग्रही मागणी भंडारा शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून करण्यात आली.
याप्रसंगी प्रमुख उपस्थितांमध्ये सर्वश्री जिल्हाध्यक्ष नानाभाऊ पंचबुध्दे, प्रदेश सरचिटणीस धनंजय दलाल, महिला जिल्हाध्यक्षा सरिता मदनकर, शहर अध्यक्ष हेमंत महाकाळकर, पंचायत समिती सभापती सौ. रत्नमाला चेटूले, मनिष वासनिक, राहुल निर्वाण, मंजुषा बुरडे, स्वप्निल नशिने, अश्विन बांगडकर, उमेश ठाकरे, जुगल भोंगाडे, सुनिल साखरकर, राजु साठवणे, राजु पटेल, भारत लांजेवार, गणेश बाणेवार, अमन मेश्राम, विष्णु कढीखाये, फरहान पटेल, किरण वाघमारे, राजेश वासनिक, जयश्री मेश्राम, सुरेश थोटे, निशा राऊत, तारकेश अहिरकर, किर्ती कुंभरे व फार मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.