मुख्याधिकारी यांच्या हस्ते नवनियुक्त पथविक्रेता सदस्यांचा सत्कार

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी तुमसर : नगर परिषद तुमसर च्या वतीने पथविक्रेता सदस्य निवडणुकीची प्रक्रिया गुरुवार दिनाक २९ आॅगस्ट रोजी घेण्यात आली. त्यामध्ये सर्व सदस्य बिनविरोध निवडुन आले. नगर परिषद तर्फे घेण्यात आलेल्या या निवडणुकीत निवडणुक निर्णय अधिकारी म्हणुन मुख्याधिकारी सिद्धार्थ मेश्राम यांचे हस्ते निवडुन आलेल्या सर्व नवनिर्वाचित सदस्यांचा प्रमाणपत्र देवुन सत्कार करण्यात आला. बिनवीरोध निवडुन येणाºयांमध्ये सर्वसाधारण खुला गटातुन प्रमोद विठ्ठल वैद्य,शिवशंकर मुरलीधर सेलोकर, सोनू शिवशंकर चाचेरे,(महिला राखिव) गटातुन आशीष सुनील मालाधारे अनुसूचित गटातून , शिल्पा प्रवीण बानासुरे (महिला राखिव),अंजू रामेश्वर गणवीर (महिला राखिव अनु जाति) रतिराम शामराव भोयर (दिव्यांग/विकलांग) व अनुसूचित जमाती गटा करिता विहित का कूठलेही अर्ज प्राप्त झालेले नाहीत. वरील सर्व सदस्य बिनविरोध निवडून आले असुन तुमसर नगर परिषद ,नगर परिषद पथ विक्रेता(उप जीविका) सरक्षण व पाथ विक्री विनियम) अधिनियम २०१६ अनव्ये नगर परिषद क्षेत्रतील पाठविक्रेता यांचे विनियमन व नियंत्रण करण्याकरिता एकुन २० सदस्यांची नगर पथ विक्रेता समिति स्थापन करन्यात आली.

यात शासकीय विभागतील ५ सदस्य यांच्यासह पथ विक्रेत्यांचे ८ सदस्य नोंदनीकृत पथ विक्रेत्यामधुन निवडणुकीदवारे घेण्याचे अधिनियम २०१४ मध्ये नमुद आहे. सदर निवडणुक प्रक्रिया नगर परिषद अंतर्गत दि.२ आॅगस्ट २०२४ रोजी निवडणुक कार्यक्रम जाहिर करण्यात आले यात दि.१२ ते १३ अगस्त पर्यंत नाम निर्देशन पत्र स्विकार करण्यात आले .सदस्य पदाक-ि रताप्राप्त अर्ज प्रवर्ग निहाय प्राप्त झाल्याने सर्वच सात ही सदस्याची बिनविरोध निवड करण्यत आली. विहित कालावधित काही अर्जाची कागदपत्र पुर्तता न केल्याने ते अर्ज अवैध ठरविण्यात आले. निवडणुक निर्णय अधिकारी तथा मुख्याधिकारी यांनी सातही सदस्यांना विजयी घोषीत करीत त्यांना प्रमाणत्र वाटप करण्यात आले.याप्रसंगी निवडणुक निर्णय अधिकारी तथा मुख्याधिकारी सिध्दार्थ मेश्राम, उपमुख्याधिकरी सुनील साळुंखे, सह.प्रकल्प अधिकारी यमुना नागदेवे व नगर परिषदेचे अधिकारी/कर्मचारी उपस्थित होते.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *